नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय दिलाय. एका खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच यासाठी तरुणाला दोषी धरता येणार नाही हेही नमूद केलं. यवतमाळ सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपी तरुणाला दोषी मानत 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तीही उच्च न्यायालयाने रद्द केली.