काल होता, आज कुठे गेला? नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला

नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत.

काल होता, आज कुठे गेला? नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला
Nagpur Bus Stop Theft

नागपूर : नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत. सध्या या बसस्टॉप चोरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत.

नागपुरात सिवेज लाईनवरील चेंबरची झाकणं चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, आता नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रवाशांना उनवारा आणि पावसापासून बचावासाठी आधार असलेले नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप अक्षरशः गायब झालं आहे.

गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.

प्रशासनाने काहीही कारवाई न केल्याने परिसरातील प्रवाशांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

संबंधित बातम्या :

गुरु-शिष्याचे बारा वर्ष प्रेमसंबंध, महिलेचे अन्यत्र सूत जुळले, नागपुरात शिष्याकडून हत्या

नागपुरात दारुड्या इंजिनिअर पित्याने पोटच्या मुलीचा गळा आवळला, चिमुरडीचे प्राण कसे वाचले?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI