चहा टपरीवर थांबायचा, बोलणं ऐकून हेरायचा सावज.. नको ते चाळे करणारा भोंदू बाबा कसा झाला गजाआड ?
भोंदूबाबा हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा' मूळचा पश्चिम बंगालचा आहे. पण गेल्या 20 वर्षांपासून तो नागपूरमध्ये स्थायिक आहे. सदर घटनेबाबत पीडित महिलेने तक्रार नोंदवल्यानतंर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा, आणि तेथे लोक घरातील समस्या बोत असतील तर ते ऐकायचा आणि सावज हेरायचा.

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत एका महिलेसोबत वारंवार अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कुटुंबावरचं संकट दूर करेन असं आश्वासन देत त्याने पीडित महिलेच्या घरात प्रवेश मिळवला आणि त्यानंतर त्याने महिलेसोबत वारंवार अश्लील कृत्य केल्याचं उघड झालं आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा’ असं त्या भोंदू बाबाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केलं. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा’ मूळचा पश्चिम बंगालचा आहे. पण गेल्या 20 वर्षांपासून तो नागपूरमध्ये स्थायिक आहे. सदर घटनेबाबत पीडित महिलेने तक्रार नोंदवल्यानतंर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी भोंदू बाबाला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.
चहाच्या टपरीवरून हेरायचा सावज
सदरील भोंदूबाबा हा त्याच्या भागात मामा म्हणून प्रसिद्ध आहे . अनेक गरीब लोकं आणि कष्टकरी लोक हे त्याच्या टार्गेटवर असायचे. तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा, आणि तेथे लोक घरातील समस्या बोत असतील तर ते ऐकायचा. त्यानंतर मी काळी जादू करतो,समस्या सोडवता असे त्यांना सांगायचं.
मदतीच्या बहाण्याने , घरातील संकट दूर करतो असं सांगतच त्याने पीडित महिलेच्या घरातही प्रवेश मिळवला होता. आणि मी काळी जादू जाणतो म्हणुन महिलेला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर तो भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून त्या महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता. एवढंच नव्हे तर त्यान त्या महिलेला कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. मात्र त्या महिलेने हिंमत दाखवत अन्यायाला वाचा फोडण्याचं ठरवलं आणि तिने नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत ,सगळा प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यााआधने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे..
