AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येच रहस्य उलगडलं, डॉक्टर पतीनेच हे सर्व केलं, कारण, त्याला वाटायचं की…

Nagpur Crime : डॉक्टर अर्चना राहुले या सरकारी मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयात 'फिजियोथेरेपी' विभागात सहायक प्रोफेसर पदावर कार्यरत होत्या. नागपूर येथील राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आता तपासात या सगळ्यामागे त्यांचा डॉक्टर पतीच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Nagpur Crime : डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येच रहस्य उलगडलं, डॉक्टर पतीनेच हे सर्व केलं, कारण, त्याला वाटायचं की...
Doctor Murder Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 11:19 AM
Share

नागपूरमधील डॉ. अर्चना राहुले हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 50 वर्षीय महिला डॉक्टर त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या डोक्यावर काही जखमा होत्या. कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केल्याचे या मधून संकेत मिळाले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे क्षेत्रात लाडीकर लेआउट येथे या महिला राहत होत्या. मृत महिलेच संपूर्ण नाव डॉ. अर्चना अनिल राहुले आहे. सरकारी मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयात ‘फिजियोथेरेपी’ विभागात सहायक प्रोफेसर पदावर त्या कार्यरत होत्या.

डॉ. अर्चना नागपूरध्ये एकट्या रहायच्या. त्यांचे पती डॉ. अनिल राहुले रायपुर छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहेत. मुलगा तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येमागे त्यांच्या पतीचा हात आहे. चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीची हत्या केली.

नवरा-मुलगा दोघेही दुसऱ्या राज्यात असायचे

या हत्या प्रकरणात डॉ. अनिल राहुले यांना त्यांच्या भावाने रवी राहुलेने मदत केली. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो.

पतीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

डॉ. अनिल राहुले यांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांनी घरी परतल्यानंतर घरातून दुर्गंध येत असल्याची त्यांनी सूचना दिली. घराचा मुख्य दरवाजा सुद्धा उघडा होता. घरात आत जाऊन पाहिलं, तेव्हा पत्नीचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. हे दृश्य पाहून आपण लगेच पोलिसांना कळवलं, असं नवऱ्याने सांगितलं. मृतदेहाला दुर्गंधी येत होती. त्यामुळे तीन दिवस आधीच हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आताच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईच ठरेल. पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी डॉ. अर्चना यांचे मोबाइल फोन रेकॉर्डही तपासले असं पोलिसांनी सांगितलं.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.