Nanded Crime | चोरीचा माल वाटून घेण्यावरुन वाद, 6 जणांच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश!

Nanded News : अल्पवयीन मुलांच्या मदतीनेच या टोळीनं चोऱ्यांचा सुळसुळाट सुरु ठेवला होता.

Nanded Crime | चोरीचा माल वाटून घेण्यावरुन वाद, 6 जणांच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश!
चोरीचा मुद्देमाल हस्तगत
Image Credit source: TV9 Marathi
राजीव गिरी

| Edited By: सिद्धेश सावंत

May 01, 2022 | 8:44 AM

नांदेड : चोरीचा माल वाटून घेण्यावरुन चोरट्यांमध्ये वाद झाला. हा वाद चोरट्यांच्या (Nanded Crime news) चांगलाच अंगलट आला. नांदेडमध्ये चोरीचा (Nanded Theft) माल वाटून घेण्यावरुन वाद घालणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवली. या चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी (Nanded Police) पर्दाफाश केलाय. नांदेडच्या गुन्हे शोध पथकाच्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या पथकानं ही कारवाई करत चोरट्यांकडून धारदार शस्त्रांसह वेगवेगळे मोबाईल फोनही जप्त केले. या चोरट्यांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. अनेक चोऱ्या या टोळीनं केल्या असल्याचा पोलिसांनी संशय आहे. धक्कदायक बाब म्हणजे या टोळीतील काही चोरटे हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता अनेक चोरीच्या घटनांची उकल होण्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.

वाद घालणं भोवलं..

नांदेडमध्ये चोरीचा माल वाटून घेण्यावरून चोरट्यात वाद झाला आणि चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. एकूण सहा जणांच्या या टोळीकडून चोरीचा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यात प्रामुख्याने चोरलेले मोबाईल, एक दुचाकी आणि धारधार शस्त्रांचा समावेश आहे.

…आणि अडकले!

विशेष म्हणजे या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या अल्पवयीन मुलांच्या मदतीनेच या टोळीनं चोऱ्यांचा सुळसुळाट सुरु ठेवला होता. याच दरम्यान चोरीच्या मालाची वाटणी करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात बसले होते, त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने पोलिसांना याची कुणकुण लागली आणि चोरटे मुद्देमालासह अलगद पोलिसांच्या तावडीत अडकले.

कसून चौकशी सुरु

सध्या या चोरट्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. वेगवेगळे महागडे मोबाईल फोन या चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याचप्रमाणे धारधार शस्त्रासह एक बाईकही पोलिसांनी हस्तगत केली आहे. नांदेड शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या चोरांच्या चौकशीतून चोरीच्या अनेक प्रकरणांचं गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें