आधी मुलगी पळून गेली, नंतर मुलीच्या बापाला मारहाण, नांदेडच्या हाणेगावात काय घडलं?

नांदेडच्या देगलूड जिल्ह्यातील हाणेगावात सध्या तणावाचे वातावरण आहे. या वातावरणाला कारण ठरलंय ते म्हणजे एका हिंदू तरुणीचं मुस्लिम समाजाच्या तरुणासोबत झालेला प्रेमविवाह (Nanded Hanegaon dispute three to five people beat man on his daughter love marriage).

आधी मुलगी पळून गेली, नंतर मुलीच्या बापाला मारहाण, नांदेडच्या हाणेगावात काय घडलं?
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:17 PM

नांदेड : नांदेडच्या देगलूड जिल्ह्यातील हाणेगावात सध्या तणावाचे वातावरण आहे. या वातावरणाला कारण ठरलंय ते म्हणजे एका हिंदू तरुणीचं मुस्लिम समाजाच्या तरुणासोबत झालेला प्रेमविवाह. हाणेगावातील कापड व्यावसायिकाच्या मुलीचे त्यांच्याच शेतात काम करणारे बटाईदार मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह देखील केला. मुलीचे वय 19 वर्ष आहे. तसेच ती बारावी उत्तीर्ण आहे. तर मुलगा दहावी नापास आहे, अशी माहिती समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांच्या प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांनी काही तरुणांकडून मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर गावात तणावाचं वातावरण आहे (Nanded Hanegaon dispute three to five people beat man on his daughter love marriage).

मुलीच्या कुटुबियांचे नेमके आरोप काय?

मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार बटाईदार असणाऱ्या मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलाने मुलीशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याचा आरोप आहे. यात मुलीच्या प्रियकराने परंपरागत 74 तोळ्याचे दागदागिने, सोने, नगद 25 लाख रुपयासह पोबारा केलाय, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलाने मुलीचे धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे (Nanded Hanegaon dispute three to five people beat man on his daughter love marriage).

मुलगी जानेवारी महिन्यात प्रियकरासोबत निघून गेली

जानेवारी महिन्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तेव्हा तक्रार दिली होती. पण मुलगी सज्ञान असल्याने पोलिसांनी मुलगी हरवल्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी देगलूर न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीविरुद्ध न्यायालयाकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार मरखेल पोलीस ठाण्यात मुलीसह तिच्या प्रियकर आणि प्रियकर कुटुंबाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला.

प्रियकराच्या वडील आणि भावाला जामीन

मुलीच्या प्रियकराच्या वडील आणि भावाने याप्रकरणी कोर्टातून जामीनही मिळवलाय. मात्र मुलगी आणि तिचा प्रियकर चोरीच्या या गुन्ह्यात अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर मुलीने जानेवारी महिन्यात पळून जाऊन आंतरधर्मीय विवाह केला होता. मुलगी हैदराबाद इथे असून तिने धर्मांतर केल्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुलीच्या वडिलांना मारहाण

दरम्यान, काल (7 जुलै) बुधवारी मुलीच्या वडिलांसमोर इतर धर्मीय तरुणांनी चिडवण्यासाठी शेरेबाजी केली. त्यातून झालेल्या वादातून काही तरुणांनी मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी देखील मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO : ‘मी माझ्या मर्जीने इस्लाम स्वीकारला, माझ्या कुटुंबियांपासून जीवाला धोका’, नांदेडच्या ‘त्या’ तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

नांदेडमध्ये ‘लव्ह-जिहाद’ की प्रेम प्रकरण? बटाईदाराच्या दहावी नापास पोराबरोबर मुलगी पळाली, 72 लाखाचे दागिने घेऊन गेल्याची पोलिसात तक्रार

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.