ऊसतोड मजुराच्या घराला आग, वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात

धडगाव तालुक्यात ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली

ऊसतोड मजुराच्या घराला आग, वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात
nandurbar (1)Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 12:06 PM

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबारच्या (Nandurbar) धडगाव (dhadgaon) तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील ऊसतोड कामगार बामण्या लाखा वसावे यांच्या घराला भर दुपारी आग लागून घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपूर (pandarpur) येथे ऊस तोडीच्या कामासाठी स्थलांतर झालेले आहे. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार अचानक दुपारी घरातून धुराचे लोट निघताना दिसले. त्यानंतर जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल, त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु बामण्या लाखा वसावे यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाले, आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण शक्य झाले नाही. या आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच वाहरीबाई सुरजसिंग पाडवी व गावकऱ्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अचानक आग लागल्यामुळे सगळीकडे धुराचे लोट दिसत होते. त्यामुळं तिथं बघ्यांची गर्दी झाली. परंतु टेकडावर घर असल्यामुळे वारेमोड जोरात होती. त्यामुळे आग विझवताना नागरिकांना त्रास झाला. घरातील वस्तू पुर्णपणे जळाल्या असल्याचे दिसत आहेत. त्यांना मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. त्याचं हातावर पोट आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.