डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित, खटला चालवला जाणार

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टानं दोषारोप निश्चित केले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणानंतर तब्बल 8 वर्षानंतर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. 5 आरोपींपैकी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना येरवाड्यात आणलं जाणार आहे. आता या पाचही आरोपींविरोधात खटला चालवला जाणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित, खटला चालवला जाणार
डॉ. नरेंद्र दाभोळकर


पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणात 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टानं दोषारोप निश्चित केले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणानंतर तब्बल 8 वर्षानंतर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. 5 आरोपींपैकी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना येरवाड्यात आणलं जाणार आहे. आता या पाचही आरोपींविरोधात खटला चालवला जाणार आहे. (Charges fixed against 5 accused in Dr. Narendra Dabholkar murder case)

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्ष पूर्ण

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.

दाभोळकरांच्या हत्येला 8 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पाच वर्षानंतर या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. नालासोपारा स्फोटकप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले होते. या घटनेला इतके वर्षे उलटूनही या प्रकरणाचा खटला सुरु न झाल्याने पीडित कुटुंबाच्या वतीने काम पाहणाऱ्या वकिलांनी यावर प्रश्न उभे केले होते. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी हत्या झाली होती. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबई हायकोर्टात खटला सुरु आहे.

“दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा एकमेकांशी संबंध”

“दाभोलकरांच्या खूनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खूनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हा एकमेकांशी जोडलेले आहेत. या पाचही प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. हा एका मोठ्या व्यापक कटाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ काही तरुण आरोपी पकडलं जाणं पुरेसं नाही. त्यांना पैसे पुरवणारं कोण आहे, हा मोठा कट तयार करणारे कोण आहेत एकूणच या संपूर्ण कटाचे सूत्रधार कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी हा व्यापक कटाचा भाग असल्याचं निरिक्षण नोंदवलंय. म्हणूनच या कटाच्या मुळांशी पोहचणं गरजेचं आहे,” असं मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा केलेली 113 एकर जमीन पुन्हा मिळवली; पडळकरांचं सूचक ट्विट

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

Charges fixed against 5 accused in Dr. Narendra Dabholkar murder case

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI