‘बाबांनी तो मॅजिक बॉल मुद्दाम आणला अन् बाळाने गिळला …’ आईची नेमकी काय तक्रार?

नाशिक उपनगर पोलीस स्टेशनकडून सदर घटनेचा तपास सुरु आहे.

'बाबांनी तो मॅजिक बॉल मुद्दाम आणला अन् बाळाने गिळला ...' आईची नेमकी काय तक्रार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 4:16 PM

चंदन पूजाधिकारी, नाशिकः लहान बाळाच्या (Small Baby) खेळण्याकडे दुर्लक्ष झालं तर किती अनर्थ घडू शकतो, हे दाखवणारी दुर्दैवी घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. 18 महिन्यांच्या बाळाचा एकाएकी मृत्यू झाला. पण त्यानंतर आणखी गंभीर म्हणजे बाबांच्या चुकीमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आईने केला आहे. बाळाच्या आई (Mother) आणि बाबांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. या वादामुळेच बाळाच्या वडिलांनी घरात मॅजिक बॉल आणल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे.

कुठे घडला प्रकार?

नाशिकमध्ये सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडली असली तरीही महिलेच्या तक्रारीनंतर ही घटना चर्चेत आली आहे.   नाशिक शहरातील मोटवानी रोड भागात हा प्रकार घडला. बाळाच्या मृत्यूसाठी त्याचे वडील जबाबदार असल्याची तक्रार आईने दिली आहे. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकी तक्रार काय?

बाळाच्या आईच्या मते, वडिलांना मेडिकल फील्डची पूर्ण माहिती होती. छोटा मॅजिक बॉल गिळल्याने बालकाचा मृत्यू होऊ शकतो, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मुद्दामहून त्यांनी हा बॉल घरात आणला आणि तो गिळल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला, अशी तक्रार आईने केली आहे.

नाशिक उपनगर पोलीस स्टेशनकडून सदर घटनेचा तपास सुरु आहे. बाळाच्या खेळण्याकडे दोघांचेही दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडलाय का? की महिलेच्या आरोपानुसार, वडिलांनी मुद्दाम हा बॉल मुलाला खेळण्यास दिला, याचा शोध पोलीस घेतली. सध्या तरी पती-पत्नीच्या वादामुळे बाळाकडे दुर्लक्ष होऊन हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.