AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंत्यविधीहून येणाऱ्या पती-पत्नीला नाशिकमध्ये डंपरने चिरडले; रस्त्यावर हाडा-मांसाचा सडा, लेकरांचा आकांत

विठ्ठल घुगे यांनी अत्यंविधी आटोपल्यानंतर घरी मुलांना फोन केला. आम्ही निघालो आहेत. पाणी तापायला ठेवा, असा निरोप दिला. मुलांनी पाणी तापायला ठेवले.मात्र, वाटेत त्यांचा अपघात झाला. ही माहिती समजताच त्यांची मुलगी आणि मुलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेला आई-वडिलांचा चिखल-मासांचा सडा पाहून त्यांनी आकांत मांडला.

अंत्यविधीहून येणाऱ्या पती-पत्नीला नाशिकमध्ये डंपरने चिरडले; रस्त्यावर हाडा-मांसाचा सडा, लेकरांचा आकांत
नाशिकरोड येथे दाम्पत्याला चिरडल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.
| Updated on: Feb 17, 2022 | 2:39 PM
Share

नाशिकः नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीला नाशिकरोड (Nashik Road) येथे मागून आलेल्या डंपरने चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातामध्ये (Accident) दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला, तर डंपर चालकाने पोबारा केला. विठ्ठल घुगे (वय 49) आणि सुनीता घुगे (वय 47) अशी मृतांची नावे आहेत. घुगे दाम्पत्य मखमलाबाद येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. अत्यंविधी झाल्यानंतर ते हिरोहोंडा दुचाकीवरून (एमएच 15 ईव्ही 1867) नाशिक-पुणे महामार्गाने निघाले. ते दत्त मंदिराजवळील हॉटेल सद्गगुरू समोर येताच पाठीमागून वेगात आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू (Death) झाला. डम्परचालक उड्डाणपुलावरून पळून गेला. यावेळी घटनास्थळी लोकांनी तोबा गर्दी केली. अपघातानंतर रस्त्यावर हाडमांसाचा सडा पडला होता.

एका किंकाळीनंतर सारेच शांत…

दत्त मंदिराजवळीस हॉटेलजवळ मागून आलेल्या डम्परने घुगे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर गाडीवर सुनीता घुगे यांनी एक प्रचंड मोठी किंकाळी फोडली. किंकाळी आणि धडकेचा आवाज ऐकुन परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. रस्त्यावरील वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या. अनेकांनी मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना रुग्णालात नेणे सुद्ध शक्य झाले नाही. दोघांनी जागेवरच क्षणार्धात प्राण सोडले. अपघाताची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल केला.

घरी पाणी तापायला ठेवलेले…

विठ्ठल घुगे यांनी अत्यंविधी आटोपल्यानंतर घरी मुलांना फोन केला. आम्ही निघालो आहेत. पाणी तापायला ठेवा, असा निरोप दिला. मुलांनी पाणी तापायला ठेवले.मात्र, वाटेत त्यांचा अपघात झाला. ही माहिती समजताच त्यांची मुलगी आणि मुलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेला आई-वडिलांचा चिखल-मासांचा सडा पाहून त्यांनी आकांत मांडला. आई-पप्पा, आई-पप्पा असे शब्द आणि किंकाळ्यांनी परिसरही हादरला. त्यांचे दुःख पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. या दोन्ही मुलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे दिसत होते.

अपघात वाढले

गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघात वाढले आहेत. वाहनधारक अतिशय सुसाट गाड्या चालवतात. त्यामुळे त्यांच्या वेगाला निर्बंध घालण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्यात तर नाशिकमध्ये तब्बल नऊ दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.