पिस्तूल घेऊन मिरवणाऱ्या दोघांना धुळे पोलिसांचा दणका, गुप्त माहितीच्या आधारे मुसक्या आवळल्या

धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन गुन्हेगारांकडून पिस्तूल जप्त केल्या आहेत (Dhule police arrest two people accused who illegally carrying pistols).

पिस्तूल घेऊन मिरवणाऱ्या दोघांना धुळे पोलिसांचा दणका, गुप्त माहितीच्या आधारे मुसक्या आवळल्या
प्रातिनिधिक फोटो

धुळे : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे पोलिसांपुढील आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पोलीस त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक तरुणांमध्ये आज संयम राहिलेला नाही. एक घाव आणि दोन तुकडे, असा अनेकांचा स्वभाव आहे. यातून थोड्याश्या वादातून मोठ्या हाणामारीच्या घटना बघायला मिळतात. काही तरुण तर लोकांना धमकवण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल, तलवारी बाळगतात. मात्र, अशा तरुणांच्या मुसक्या आवळण्याचं काम पोलिसांकडून सातत्याने सुरु आहे. धुळ्याच्या गुन्हे शाखेने नुकतीच अशीच एक कामगिरी केली आबे. धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन गुन्हेगारांकडून पिस्तूल जप्त केल्या आहेत (Dhule police arrest two people accused who illegally carrying pistols).

पोलिसांना तपासातून मोठी माहिती मिळण्याची शक्यता

धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शहरातील दोन इसमांकडे बेकायदेशीररित्या गावठी कट्टा, जिवंत काडतूस आहेत. याच माहितीच्या आधारावर एलसीबीच्या पथाकाने दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडे हे शस्त्रस्त्रे नेमके आले कुठून? याचा तपास पोलीस करत आहेत. या तपासातून पोलिसांना मोठी माहिती मिळण्याचा अंदाज आहे (Dhule police arrest two people accused who illegally carrying pistols).

धुळे पोलिसांची पहिली कारवाई

धुळे शहरातील अग्रसेन पुतळ्याजवळील महाकाली टायर सर्विस सेंटरचा मालक सचिन रघुनाथ मासाळ याच्याजवळ एक गावठी कट्टा पिस्तूल असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यासाठी पोलीस त्याच्या घरीदेखील गेले. तिथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे पोलिसांत्या हाती लागले. पोलिसांनी सर्व शस्त्रे जप्त केले. तसेच आरोपी सचिनला अटक केली. त्यानंतर त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

धुळे पोलिसांची दुसरी कारवाई

पोलिसांनी दुसरी कारवाई ही धुळ्यातील आर्वी या भागात केली. आर्वीमध्ये राहणारा संदीप अशौक चौधरी याच्याकडेही गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या माहितीच्या आधारी तपास केला. पोलिसांनी थेट आरोपी संदीपलाच घेरलं. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळालं. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या ‘या’ पथकाने कारवाई केली

संबंधित कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, तसेच पोलीस सुशांत वळवी, योगेश राऊत, कुणाल पान पाटील, उमेश पवार,रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे,विलास पाटील यांनी केली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI