पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात दोघात किरकोळ करणातून वाद झाला आणि एकाने त्याच्याजवळील धारदार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?
संग्रहित छायाचित्र

नाशिक : किरकोळ कारणातून भर रस्त्यात एकाचा चाकूने भोसकून खून झाल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगार किती बेभान झाले आहेत, हे दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात दोघात किरकोळ करणातून वाद झाला आणि एकाने त्याच्याजवळील धारदार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. संशयित आरोपी आणि मयत हे दोघेही फिरस्ते असल्याची माहिती आहे.

आरोपी पसार, शोध सुरु

नितीन उर्फ सोनू गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अद्यापही फरार असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहेत. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा रंगली आहे.

कोल्हापुरात एकाची हत्या, सहा जण जेरबंद

दुसरीकडे, धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती.

कोणाकोणाला अटक

शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI