नाशिक : नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरच्या कुटुंबाने रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरांचं नाव आहे. पीडित डॉक्टर विद्यार्थी गायनॉकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयानं मात्र पीडित डॉक्टरी मानसिक स्थिती खराब असल्याच म्हणत कुटुंबाचे आरोप फेटाळले आहेत.