Nashik Accident | नाशिकमध्ये चित्त थरारक अपघात, कार पलटी खाऊन दुसऱ्या लेनच्या कारवर आदळली, हाहा:कार

मुंबई-नाशिक महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेत मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता होती. अतिशय थरारक असा हा अपघात होता. या अपघातामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Accident | नाशिकमध्ये चित्त थरारक अपघात, कार पलटी खाऊन दुसऱ्या लेनच्या कारवर आदळली, हाहा:कार
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 9:00 PM

नाशिक | 16 सप्टेंबर 2023 : नाशिक-मुंबई महामार्गावर आज भीषण अपघात घडला. या अपघातात दोन चारचाकी वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. विशेष म्हणजे एका कारचा तर चक्काचूर झालाय. अपघात प्रचंड भयानक होता. संबंधित अपघात अंगावर काटा आणणारा होता. सुदैवाने या अपघातात कुणाचाही जीव गेला नाही. पण दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा घटना घडली तेव्हा प्रचंड थरकाप उडाला. या अपघातग्रस्त वाहनांची अवस्था पाहिल्यावर अपघात किती भीषण झालाय, याची आपल्याला प्रचिती येईल.

नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मुंढेगाव जवळ संबंधित अपघाताची घटना घडली. किया कार क्रमांक MH 15 HC 5540 च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही कार पलट्या खाऊन विरुद्ध बाजूच्या लेनवर गेली. अतिशय वेगाने पलट्या खात ही गाडी बाजूच्या लेनवर गेली.

संबंधित अपघातग्रस्त कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या किया कार क्रमांक MH 17 CM 6391 वर जोरात आदळली. या अपघातात कारमधील नारायण कचरू लोहकरे (वय 44), अनुसया नारायण लोहकरे (वय 36) हे दोन जण गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी जखमींना वाचवले

संबंधित घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि प्रशासन घटानस्थळी दाखल झाले. स्थानिकांनी तिथे गर्दी केली. स्थानिकांनी जखमींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने स्थाविकांच्या मदतीने तातडीने जखमींना घोटी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमींना महामार्ग पोलिसांच्या मदतीने घोटी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.