AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षिका अर्धनग्न झाली अन्… विद्यार्थ्यासोबत केलं असं काही की मोबाईल सापडताच आईला बसला धक्का!

नवी मुंबईत एका ३५ वर्षीय शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत अश्लील व्हिडीओ चॅटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलाच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर शिक्षिकेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण केले असून, समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

शिक्षिका अर्धनग्न झाली अन्... विद्यार्थ्यासोबत केलं असं काही की मोबाईल सापडताच आईला बसला धक्का!
फोटो प्रातिनिधिक
| Updated on: Jul 30, 2025 | 5:03 PM
Share

नवी मुंबईत घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडले आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत अश्लील व्हिडीओ चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय शिक्षिकेची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. ही ओळख कालांतराने मैत्रीत बदलली. २७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास या दोघांनी व्हिडीओ चॅटिंग केले. या चॅटिंगदरम्यान शिक्षिकेने अर्धनग्न अवस्थेतील स्वतःचे चित्रीकरण मुलाला पाठवले. मुलाने हे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते.

यानंतर एकदा मुलाची आई त्याचा मोबाईल तपासत असताना हे आक्षेपार्ह चित्रीकरण तिच्या निदर्शनास पडले. यानंतर तिने तात्काळ मुलाला याबद्दल विचारले असता, त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, मुलाच्या आईने जराही वेळ न घालवता कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठले. यानंतर तिने संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.

त्या मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने शहानिशा केली. प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

समाजात तीव्र संताप

शिक्षिकेने केलेल्या या कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षकांना समाजात आदरणीय स्थान दिले जाते. ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडूनच असे गैरकृत्य घडल्याने पालक वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून, लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.