नौदल अधिकाऱ्याचा सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, मुंबईतील शेअरिंग फ्लॅटमध्ये अत्याचार

मुंबईतील कुलाबा परिसरात आरोपी आणि पीडित महिलेचा पती असे दोघे नौदल अधिकारी शेअरिंगवर फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. (Navy personnel Rapes colleague’s wife)

नौदल अधिकाऱ्याचा सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, मुंबईतील शेअरिंग फ्लॅटमध्ये अत्याचार
नौदल अधिकाऱ्याला अटक

मुंबई : सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेव्ही अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये नौदलातील दोघे अधिकारी राहत होते. आरोपीने फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीवर गेल्या महिन्यात लैंगिक अत्याचार केला. मात्र धमक्यांच्या भीतीने गप्प बसलेल्या विवाहितेने अखेर धीर एकवटून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. (Navy personnel allegely Rapes colleague’s wife after entering room on pretext of giving head massage in Mumbai)

मुंबईतील कुलाबा परिसरात आरोपी आणि पीडित महिलेचा पती असे दोघे नौदल अधिकारी शेअरिंगवर फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. गेल्या महिन्यात पीडितेचा प्रशिक्षणासाठी केरळला गेला होता. त्यावेळी हेड मसाज करण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार विवाहितेने दिली आहे. बलात्काराची तक्रार दिली तर मी आत्महत्या करुन तुझ्या नवऱ्यालाच यात अडकवेन, अशी धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे घाबरलेली पीडिता गप्प बसली होती. मात्र धीर एकवटून तिने पतीला ही गोष्ट सांगितली आणि प्रकरणाला वाचा फुटली.

नेमकं काय झालं?

29 एप्रिल रोजी आरोपीला प्रमोशन मिळालं होतं. त्यावेळी त्याने पीडितेला दुबईहून आणलेली चॉकलेट्स दिली. त्यानंतर आरोपीने मद्यपान केले. डोकं दुखत असल्यामुळे पीडिता स्वतःच्या बेडरुममध्ये पेन किलर घेऊन झोपली. त्यावेळी आरोपी हेड मसाज देण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीत आला.

आरोपीची पीडितेला धमकी

डोक्याला मसाज करतानाच मद्यधुंद अवस्थेत त्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगणार असल्याचं म्हटलं. तेव्हा आरोपीने गोळी झाडून आत्महत्या करण्याची धमकी दिली. इतकंच नाही, तर पीडितेच्या पतीला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याचाही इशारा दिला. त्यामुळे पीडिता घाबरली आणि तिने नस कापून घेण्याचाही प्रयत्न केला.

अखेर तिने धीर एकवटून घडलेला प्रकार फोनवर नवऱ्याला सांगितला. गेल्या आठवड्यात तिचा पती केरळहून मुंबईला आला. त्यानंतर त्याने नेव्ही पोलिसात तक्रार केली. अखेर कफ परेड पोलिसात गुन्हा दाखल करुन आरोपी नौदल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

(Navy personnel allegely Rapes colleague’s wife after entering room on pretext of giving head massage in Mumbai)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI