5

नक्षलवाद्यांचा पुन्हा नंगानाच, बॉम्बने घर उडवलं, 4 लोकांची हत्या करुन मृतदेह लटकवले, बुद्धाच्या पवित्र गयेत काय घडलं?

बिहारच्या गयामध्ये शनिवारी सायंकाळी उशिरा नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात नक्षलवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली. हत्येनंतर चौघांचेही मृतदेह घराबाहेर लटकवून ठेवले.

नक्षलवाद्यांचा पुन्हा नंगानाच, बॉम्बने घर उडवलं, 4 लोकांची हत्या करुन मृतदेह लटकवले, बुद्धाच्या पवित्र गयेत काय घडलं?
Bihar Naxal attack
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 1:49 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालत विकासाला आड येणाऱ्यांना यमसदनी धाडण्याचा इशाराच यानिमित्ताने महाराष्ट्र शासन आणि पोलिसांनी लक्षलवाद्यांना दिला. त्याचवेळी बिहारच्या गयामध्ये शनिवारी सायंकाळी उशिरा नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात नक्षलवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली. हत्येनंतर चौघांचेही मृतदेह घराबाहेर लटकवून ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एकाच घरातील दोन पती आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी त्यांचं गावही बॉम्बने उडवलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तूर्तास या घटनेची अधिक माहिती मिळणे बाकी आहे. परंतु सध्या हाती आलेल्या माहितीनुसार दोन महिलांसह चार जणांची हत्या करण्यात आली आहे.

यावेळी नक्षलवाद्यांनी एक घर बॉम्बने उडवले आणि मोटारसायकली पेटवल्या. याच प्रकरणावर बोलताना एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, ‘निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले त्याच ठिकाणी ही हत्या झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे’.

मारले गेलेले लोक कोण आहेत?

मृतांमध्ये सतेंद्र सिंग, महेंद्र सिंग, मनोरमा देवी आणि सुनीता सिंग यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी पोस्टर्स लावून खुलासा करताना म्हटलं आहे की, देशद्रोही आणि मानवतेचा द्रोह करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही. अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या चार साथीदारांच्या हत्येचा हा बदला आहे. अशी कारवाई यापुढेही सुरूच राहील. घटनास्थळी लावलेले पत्रक जनमुक्ती छात्रकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

गडचिरोलीत मोठी कारवाई

गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. पोलीस आणि सी-16 टीमने 26 नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर केला. ही गेल्या वर्षभरातील मोठी कारवाई आहे. देशातीलही ही मोठी कारवाई आहे. ही कारवाई गडचिरोली एसपी अंकित गोयल. समीर शेख आणि सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या कारवाईत चार पोलीस जखमी झाले आहेत. हे पोली ऑरेंज सिटी नागपूरला अॅडमिट आहेत. मी काल डॉक्टरांशी बोललो. दोन पोलिसांशीही बोललो. त्यांच्या उपचाराबाबतच्या सूचना दिल्या आहेत. उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मी या पोलिसांना जाऊन स्वत: भेटणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

naxal encounter: गडचिरोलीत नेमकं काय घडलं?; एकनाथ शिंदे म्हणाले, 10 तास सुरू होती चकमक

Non Stop LIVE Update
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?