AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rape Case | राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलंय.

Rape Case | राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी
| Updated on: Dec 30, 2020 | 8:12 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलंय. यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू आलं. त्यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेही उपस्थित होते (NCP leader Mehboob Shaikh Press Conference over allegations of rape).

यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले, “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. महिलेच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले, तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये. दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन.”

“मी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना फोन केला. तसेच याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. ज्या महिलेनं हा आरोप केलाय त्यांना मी कधी पाहिलेले नाही. गरज पडली तर मी नाक्रो टेस्ट करायला तयार आहे. 9, 10, 11 डिसेंबरला मी मुंबईत‌ होतो. मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी,” असंही मेहबूब शेख यांनी नमूद केलं.

“राजकीय षडयंत्रापोटी मेहबूब शेख यांना अडकवण्याचा प्रयत्न”

महेश तपासे म्हणाले, “औरंगाबाद पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून मेहबूब शेख या नावाचा उल्लेख असलेली तक्रार दाखल करण्यात आली. ही व्यक्ती कोण याचा तपास लागण्याआधीच तक्रारीत नाव घेण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेच आहेत, असा दावा भाजपा नेत्यांनी केलाय. भाजपकडून केवळ राजकीय षडयंत्रापोटी हा दावा करण्यात आला आहे. या आरोपांचं आम्ही खंडण करतो. या प्रकरणातील तपासाला मेहबूब शेख पूर्ण सहकार्य करतील”

यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले हे देखील उपस्थित होते.\

मेहबुब शेख कोण आहेत?

  • मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत
  • मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी
  • सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय

‘तो’ मी नव्हेच!

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबुब इब्राहिम शेख आपण नाही, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे. फिर्याद दिलेल्या महिलेने 14 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील रामगिरी हॉटेलनजिकच्या एका महाविद्यालयाजवळील निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबुब इब्राहिम याने कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरुन सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबुब शेख यांनी गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मेहबुब शेख कोण? असा सवाल पोलिसांनाच विचारला आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन यामागील खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, असंही शेख यांनी म्हटलंय. फिर्यादीत फक्त नावाचा उल्लेख असल्यामुळे नेमका मेहबुब इब्राहिम शेख कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या

NCP leader Mehboob Shaikh Press Conference over allegations of rape

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...