Extra Marital Affair: काकूचं बाहेर लफडं! पुतण्यानं अश्लिल व्हिडिओ बनवून मागीतले 25 लाख

पीडित महिला ही बंगळुरू येथील राहणारी आहे. ही महिला आपल्या पती आणि कुटुंबासह राहत होती. मात्र या महिलेचे तिच्या प्रियकरा सोबत मागील दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. ती हॉटेल तसेच इतर ठिकाणी आपल्या प्रिय करायला भेटायला जायची. तिचं हे प्रेम प्रकरण तिच्या पुतण्याला कळाले होते. यामुळेच त्याने काकू कडून पैसे उकळण्याचा प्लान बनवला.

Extra Marital Affair: काकूचं बाहेर लफडं! पुतण्यानं अश्लिल व्हिडिओ बनवून मागीतले 25 लाख
वनिता कांबळे

|

Jul 21, 2022 | 11:28 PM

बंगळुरु : लग्न झालेले असताना विवाहबाह्य संबंध(Extra Marital Affair) ठेवणे एका महिलेच्या चांगलेच अंगाशी आले आहे. दुसरं तिसरं कुणी नाही तर तिच्या सख्या पुतण्याणेच तिचे बाहेरचे लफडं पकडल आहे. या पुतण्याने काकू आणि तिच्या प्रियकराचा अश्लिल व्हिडिओ बनवला. यानंतर त्याने हा व्हिडिओ कुटुंबीयांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत काकू कडे 25 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या पुतण्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे.

पीडित महिला ही बंगळुरू येथील राहणारी आहे. ही महिला आपल्या पती आणि कुटुंबासह राहत होती. मात्र या महिलेचे तिच्या प्रियकरा सोबत मागील दहा वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. ती हॉटेल तसेच इतर ठिकाणी आपल्या प्रिय करायला भेटायला जायची. तिचं हे प्रेम प्रकरण तिच्या पुतण्याला कळाले होते. यामुळेच त्याने काकू कडून पैसे उकळण्याचा प्लान बनवला.

सुरेश बाबू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. सुरेशची प्रेयसी त्याच्या काकूच्या परिचयाची होती. यामुळे तिला काकूच्या या अफेरबद्दल माहित होते. तिनेच सुरेशला काकूच्या या विवाहबाह्य संबंधाबद्दल सांगितले. यानंतर या दोघांनी काकूकडे खंडणी मागण्याचा प्लान बनवला. पीडित महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये जाणार होती. यासाठी तिने एक रूम देखील बुक केला होता. सुरेशच्या प्रेयसीने याबद्दल त्याला सांगितले. मग या दोघांनी काकू आणि तिचा प्रियकर हॉटेलमध्ये पोहचण्याआधीच तेथे जाऊन एक छुपा कॅमेरा बसवला.

काकू तिच्या प्रियकरासह या रूमवर गेली. यावेळी त्यांच्यातील खाजगी क्षण या छुपा कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर सुरेशने एका अनोळखी नंबर वरून त्याची व्हिडिओ क्लिप काकूला पाठवली. 25 लाख रुपये दे नाहीतर ही व्हिडिओ क्लिप तुझा नवरा आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल केली जाईल अशी धमकी सुरेश ने दिली.

यानंतर पीडित महिलेने या व्हिडिओ क्लिप बाबत सुरेशच्या प्रेयसीला सांगितले. यावेळेस तिने देखील आपल्याकडे अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप आल्याचे काकूला सांगितले तू पैसे देऊन टाक असा सल्लाही तिने दिला.

यामुळे महिलेला या मुलीवर संशय आला. महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत या सर्व प्रकरणाची तक्रार दाखल केली. यांनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. ज्या नंबर वरून महिलेला व्हिडिओ पाठवण्यात आली होती तो नंबर पोलिसांनी ट्रेस केला. यावेळी या नंबरचे लोकेशन पीडित महिलेच्या घरातच दाखवले. पोलिसांनी तात्काळ सुरेशच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. यानंतर या तरुणीने सुरेश आणि तिने काकूची व्हिडिओ क्लिप बनवून तिच्याकडून पैसे उकळण्याचा कट बनवल्याची कबुली दिली. यांनतर पोलिसांनी सुरेश आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें