क्राईम किस्से : 19 कवट्या आणि कुजलेले असंख्य अवयव, थरकाप उडवणारं 2006 चं निठारी हत्याकांड

| Updated on: Dec 03, 2021 | 7:05 AM

29 डिसेंबर 2006 रोजी निठारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील D-5 या घराच्या मागील बाजूच्या नाल्यात बेपत्ता झालेल्या मुलांचे अवशेष पाहिल्याचा दावा निठारी गावातील दोन रहिवाशांनी केला होता. मोनिंदर सिंग पंधेर (Moninder Singh Pandher)आणि त्याच्याकडे घरकाम करणारा सुरिंदर कोली (Surinder Koli) हे या प्रकरणातील संशयित होते.

क्राईम किस्से : 19 कवट्या आणि कुजलेले असंख्य अवयव, थरकाप उडवणारं 2006 चं निठारी हत्याकांड
सुरिंदर कोली, मोनिंदर सिंह पंधेर
Follow us on

मुंबई : 2006 मधील बहुचर्चित निठारी हत्याकांड (Nithari Serial Murders) हे भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर सिरीअल किलींग खटल्यांपैकी एक मानले जाते. दिल्ली नजीकच्या नोएडामधील सेक्टर 31 मधल्या डी-5 मध्ये बलात्कार, खून, अपहरण इथपासून मृतदेहांबदद्लची आसक्ती (necrophilia) इथपर्यंत सर्व काही गुप्तपणे घडत होते.

नेमकं काय घडलं?

29 डिसेंबर 2006 रोजी निठारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील D-5 या घराच्या मागील बाजूच्या नाल्यात बेपत्ता झालेल्या मुलांचे अवशेष पाहिल्याचा दावा निठारी गावातील दोन रहिवाशांनी केला होता. मोनिंदर सिंग पंधेर (Moninder Singh Pandher)आणि त्याच्याकडे घरकाम करणारा सुरिंदर कोली (Surinder Koli) हे या प्रकरणातील संशयित होते. याची चौकशी करण्यासाठी, निवासी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष एस सी मिश्रा आणि इतर काही रहिवाशांनी टाकीच्या नाल्याचा शोध घेतला, तेव्हा कुजलेल्या अवस्थेतील हातांचे काही अवशेष त्यांना सापडले.

दोन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी सुरिंदर कोलीने 20 वर्षीय पायलचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी टाकी आणखी खोदण्यास सुरुवात केली, तेव्हा तिथे अनेक मृतदेह आणि लहान मुलं-तरुणींचे कुजलेले अवयव आढळून आले. अशा पद्धतीने 19 कवट्या सापडल्याचं बोललं जातं.

अपहरण, बलात्कार, खून आणि पुरावे नष्ट करणे अशा अनेक आरोपांसह हा खटला चालला. सीबीआयने सुरिंदर कोलीला नरभक्षक म्हणूनही दोषी ठरवले आहे.

खटल्याची सद्यस्थिती काय?

मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरिंदर कोली या दोघांविरुद्ध एकामागून एक असे एकूण 16 खटले दाखल झाले. त्यांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ चाचणी आणि नार्को टेस्टही करण्यात आली. 13 फेब्रुवारी 2009 रोजी मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरिंदर कोली या दोन्ही आरोपींना रिम्पा हलदर खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, नंतर अलाहाबाद हायकोर्टाने पंधेर याची निर्दोष मुक्तता केली.

तेव्हापासून अनेक प्रकरणांमध्ये कोलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मार्च 2019 मध्ये, गाझियाबादमधील सीबीआय न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात (दहावी केस) सुरिंदर कोलीला फाशीची शिक्षा सुनावली. इतर काही प्रकरणे सुप्रीम कोर्ट किंवा अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

2014 मध्ये, काही वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत मध्यरात्री सुनावणी घ्यायला लावत सुरिंदर कोलीच्या फाशीला स्थगिती मिळवली. पंचवीस वर्षांच्या मोलकरणीच्या हत्येप्रकरणी 2017 मध्ये, मोनिंदर सिंग पंढेरलाही कोलीसह फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती; ही 16 खून प्रकरणांपैकी नववी केस होती. सीबीआयने या प्रकरणांना ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ निठारी कांड असे नाव दिले आहे. सध्या दोन्ही आरोपी तुरुंगात आहेत.

संबंधित बातम्या :

सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय

विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं

कुठून आला इतका द्वेष? इलेक्ट्रिशियनच्या छातीत 13 वेळा खंजीर खुपसला, जीव गेल्यावरच मारेकरी थांबला