विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं

एका तरुणाने प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केली. संबंधित विद्यार्थिनी नात्याने त्याची भाची होती. शिक्षकाचा तिच्यावरच जीव जडला, मात्र विद्यार्थिनीने त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता

विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं
प्रातिनिधिक छायाचित्र

रांची : झारखंडमधील गढवा येथून नात्यांची लक्तरं मांडणारी एक घटना समोर आली आहे. शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर ट्रेनसमोर उडी मारुन त्यानेही जीव दिला. संबंधित विद्यार्थिनी नात्याने त्याची भाची होती. शिक्षकाचा तिच्यावरच जीव जडला, मात्र विद्यार्थिनीने त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्याने संतापाच्या भरात त्याने तिचा जीवच घेतला. या घटनेने दोघांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकही हैराण झाले आहेत. ही संपूर्ण घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची हत्या

झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील खरौंधी पोलीस स्टेशन हद्दीतील करीवाडीह गावात मंगळवारी एका तरुणाने प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केली. संबंधित विद्यार्थिनी नात्याने त्याची भाची होती. शिक्षकाचा तिच्यावरच जीव जडला, मात्र विद्यार्थिनीने त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्याने संतापाच्या भरात त्याने तिचा जीवत घेतला.

रेल्वे फाटकाजवळ सुसाईड नोट

गुन्हा केल्यानंतर आरोपी इम्तियाज अन्सारी फरार झाला. रेल्वे फाटकाजवळ सुसाईड नोट लिहून त्याने मालगाडीजवळ उडी मारत जीव दिला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. मालगाडीजवळ उडी मारल्यामुळे तरुणाचे दोन्ही पाय कापले गेले. तर त्याच्या शरीरावरही अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत.

तरुणाच्या मृतदेहापासून काही अंतरावर सुसाईड नोट सापडली. त्यावर त्याने स्वतःचं, वडील-भावाचं नाव, घरचा पत्ता लिहून ठेवला होता. आणि आपला मृतदेह या पत्त्यावर पाठवण्याची विनंती केली. पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय

कुठून आला इतका द्वेष? इलेक्ट्रिशियनच्या छातीत 13 वेळा खंजीर खुपसला, जीव गेल्यावरच मारेकरी थांबला

Published On - 1:44 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI