महिला बँकर, डॉक्टरसोबत शारीरिक संबंध, इंटिमेट फोटो, 38 लाखांना फसवलं, कोण आहे इमामुद्दीन शेख?

इमामुद्दीन शेखने तिच्या नावावर 30 लाखाच कार लोन काढलं. आता ती त्या कर्जाचे हफ्ते फेडत आहे. विरारमधल्या बोलींज पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. सुरुवातीची सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हैदराबादला पाठवून दिलं.

महिला बँकर, डॉक्टरसोबत शारीरिक संबंध, इंटिमेट फोटो,  38 लाखांना फसवलं, कोण आहे इमामुद्दीन शेख?
Image Credit source: istock
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 8:58 AM

पुणे स्थित 37 वर्षीय महिला बँकरला 38 लाख रुपयांना फसवून समंतीशिवाय तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी एका हिस्ट्रीशीटर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने महिला बँकरला लग्नाचा आश्वासन दिलं होतं. या प्रकरणाचा तपास आता पुण्यातील मुंढवा पोलीस करणार आहेत. हद्दीचा विचार न करता पोलीस झीरो एफआयआर नोंदवू शकतात. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील महिला बँकरला धक्का बसला. चंदन नगर पोलीस पुण्यातील महिलेच्या फ्लॅटवर गेले व पोलिसांच बनावट आयडी वापरल्याबद्दल आरोपी इमामुद्दीन शेख (38) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच सांगितलं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना तिचा पत्ता सापडला.

अधिकाऱ्यांनी तिला सांगितले की, इमामुद्दीन शेख हा हैदराबादमधील हुमायून नगरचा रहिवासी होता. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मुंबईला राहत नाही. विरारमध्ये त्याच्या विरोधात आणखी एक एफआयआर नोंदवल्याची माहितीही तिला पोलिसांनी दिली. विरार येथील एका डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. तिच्याशी सुद्धा शारीरिक संबंध ठेवले असं पोलिसांनी सांगितलं. आपली सुद्धा फसवणूक झालीय हे या महिला बँकरला कळून चुकलं. तिनेही आरोपी विरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

इंटिमेट फोटोज लीक

आरोपी इमामुद्दीन शेखने विरार येथील डॉक्टरला फसवलच. पण तिची बदनामी करण्यासाठी दोघांचे इंटिमेट फोटोज त्याने तिच्या नातेवाईकांना पाठवले. सध्या तो त्याच्या मूळ गावी असलेल्या हैदराबाद येथील तुरुंगात आहे. इमामुद्दीन शेखने आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचे सांगत, पुण्याच्या बँकरने आता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संमतीशिवाय शारीरिक संबंध

शेखने वैवाहिक वेबसाइटवर त्याचे प्रोफाइल पोस्ट केले होते आणि भ्रष्टाचारविरोधी गुप्तचर समितीचा गुप्तहेर एजंट म्हणून बँकरशी संवाद साधला होता. त्याने व्हॉट्सॲपवर नोकरीचे खोटे पुरावेही शेअर केले. त्यांच्या नात्याच्या काही दिवसांतच त्याने महिलेसोबत तिच्या फ्लॅटमध्ये तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तिने एफआयआरमध्ये केला आहे. लोणावळ्यात बंगल्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची असल्याचे सांगून त्याने महिला बँकरकडून 55 हजार रुपये उकळले. तिने तिच्या भावाच्या लग्नासाठी बाजूला ठेवलेले पैसे त्याला दिले.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.