माझी पाकिस्तानी बायको रोज रोज मला… कराचीतून आलेल्या तरुणाचे पत्नीवर कोणते आरोप?
कराचीत राहणाऱ्या निकिता नावाच्या महिलेने तिच्या इंदूरमध्ये राहणाऱ्या पती विक्रम कुमार नागदेव यांच्यावर दुसरे लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निकिताने म्हटले आहे की, विक्रमने भारतात दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे आणि तिला भारतात आणण्यास टाळाटाळ करतो. विक्रम यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून निकिता त्यांना त्रास देते असा दावा केला आहे.

पाकिस्तानातील कराचीत राहणाऱ्या एका हिंदू महिलेने तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा नवरा भारतात राहतो. त्याने तिकडे दुसरे लग्न केलं आहे. माझ्याकडून तलाक न घेताच त्याने लग्न केलं आहे. भारत येण्याबाबत मी जेव्हा जेव्हा त्याला बोलते तेव्हा तेव्हा तो दुसराच विषय काढतो, असं या महिलेचं म्हणणं आहे. तर, तिच्या नवऱ्याने मात्र त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. मी दुसरं लग्न केलेलंच नाही. उलट माझी पाकिस्तानी बायकोच मला रोज रोज त्रास देते, असा आरोप त्याने केला आहे.
या पाकिस्तानी नागरिकाचं नाव विक्रम कुमार नागदेव आहे. तो गेल्या 12 वर्षापासून इंदूरला राहतो. विक्रमने 2020मध्ये कराचीत राहणाऱ्या निकितासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर एक महिन्यानंतर फेब्रुवारी 2020मध्ये तो निकिताला घेऊन भारतातही आला. पण जुलै 2020मध्ये निकिता परत पाकिस्तानला गेली.
निकिताच्या आरोपावर बोलताना विक्रम म्हणाला की, निकितासोबत 2020मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसापर्यंत ती माझ्याशी व्यवस्थित वागली. पण या काळात पाकिस्तानात कराचीला जाण्याचा तिने हट्टच धरला. त्यामुळे कोरोना काळात स्पेशल व्हिसा बनवून तिला पाकिस्तानात पाठवलं. त्यानंतर तिला भारतात आणण्याचा मी बराच प्रयत्न केला. पण ती इकडे यायलाच तयार नाही. तसेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आम्ही इंदोरच्या सिंधी पंचायतीशी संपर्कही साधला. त्यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. पण पाकिस्तानात राहणाऱ्या निकिताची आधी सुनावणी केली.
दिल्लीतील मुलीला बदना करू नका
निकितासोबत माझा तलाक व्हावा असं मला वाटतं. दुसरं लग्न मी नंतर करेल. दिल्लीतील मुलीसोबत मी लग्न करत नाहीये. उलट आम्ही मुद्दाम असे फोटो काढले. आम्ही दुसरं लग्न करतोय असं निकिताला वाटावं म्हणून. असं केल्याने ती मला तलाक देईल. बायकोने मला तलाक द्यावा म्हणूनच मी हे केलं. माझा कोणत्याही मुलीशी साखरपुडा झाला नाही आणि लग्नही झालं नाही. कृपया दिल्लीवाल्या मुलीला बदनाम करू नकोस, असं विक्रमने म्हटलं आहे.
पत्नीचे आरोप काय?
निकितानेही विक्रमवर आरोप केले आहेत. विक्रमसोबत लग्न केल्यावर मी इंदोरला आले होते. पण पाच महिन्यानंतर मला कराचीत यावं लागलं. कारण व्हिसामध्ये प्रॉब्लेम होते. त्यानंतर मी अनेकदा भारतात येण्यासाठी विक्रमकडे तगादा लावला. पण तो टाळत गेला. त्याने दिल्लीतील एका मुलीसोबत साखरपुडा केल्याचं मला कळलं. तिच्याशी त्याचं लग्न होणार असल्याचंही समजलं. विक्रमने इतर कुठल्या मुलीशी लग्न करावं असं मला वाटत नाही. कारण तो माझा नवरा आहे, असं निकिताचं म्हणणं आहे.