AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपुरी दे नाहीतर… मध्यरात्री दुकानदाराने नकार दिल्यामुळे धक्कादायक प्रकार

पाणीपुरी फुकटात न दिल्यामुळे दुकानदार आणि तरुणामध्ये टोकाचे भांडण झाले. त्यानंतर जे घडले ते ऐकून पोलीसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

पाणीपुरी दे नाहीतर... मध्यरात्री दुकानदाराने नकार दिल्यामुळे धक्कादायक प्रकार
panipuriImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 19, 2025 | 6:49 PM
Share

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक तरुण रस्त्याच्या शेजारी असलेल्या पाणीपूरीवाल्याकडे जाऊन पाणी पुरीची मागणी करतो. पण तो पैसे न देता फ्रीमध्ये पाणीपुरी देण्याची मागणी केली होती. पण दुकारनदाराने देण्यास नकार दिला. तरुणाने थेट बंदूक काढून पाणीपुरीवाल्याला गोळ्या झाडल्या. पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया प्रकरण काय आहे

कर्नाटकातील बंगळुरूहून ही खळबळजनक घटना घडली. रस्त्याच्या कडेला पाणीपूरीचा ठेला लावणाऱ्या दुकानदाराची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सांगितले जात आहे की ही घटना फक्त त्यामुळेच घडली, कारण दुकानदाराने नशेत आलेल्या एका तरुणाला फुकटात पाणीपूरी देण्यास नकार दिला होता. पोलिसांच्या मते, ही घटना बेंगळुरूतील बटरायनपुरा मुख्य रस्त्यावर असलेल्या एका पानीपूरीच्या दुकानावर रात्री साधारण १०:३० वाजता घडली.

खरे तर, नेहमीप्रमाणे दुकानदार रस्त्याच्या कडेला आपला ठेला लावून होता. याचवेळी नशेच्या अवस्थेत एक तरुण तिथे पोहोचला आणि फुकटात पानीपूरी मागू लागला. दुकानदाराने स्पष्ट नकार देत सांगितले की तो पैशांशिवाय पानीपूरी देऊ शकत नाही. या गोष्टीवर आरोपी भडकला आणि दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. वादाच्या दरम्यान आरोपीने अचानक चाकू काढला आणि दुकानदाराच्या पोटात चाकूने वार केला. चाकू लागताच दुकानदार तिथेच रक्तबंबाळ होऊन कोसळला, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

रुग्णालयात नेल्यावर मृत्यू

घटनेच्या नंतर आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी ताबडतोब जखमी दुकानदाराला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी दुकानदाराला मृत घोषित केले. या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

पोलिसांनी आरोपीला केले अटक

पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पुराव्यांच्या आधारावर बेंगळुरू उत्तर विभाग पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी नशेत होता आणि किरकोळ वादानंतर त्याने ही भयानक वारदात घडवली. आरोपीकडून चौकशी सुरू आहे आणि हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा