Parambir singh : परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनामियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरवातील फरार असलेले परमबीर सिंह बऱ्याच दिवसांनी मुंबई दाखल होऊन चौकशीला सामोरे जात आहेत.

Parambir singh : परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गृहमंत्रालयातील एक गोपनीय फाईल चोरीला गेल्याचा संशय आहे. याप्रकरणी परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनामियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये ही फाईल आढळून आलीय. परमबीर सिंह यांना गुन्ह्यात मदत करण्याच्या हेतून फाईल चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हे फाईल चोरी प्रकरण परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येतंय.

परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या काही गंभीर आरोप झाले आहेत. अनेक प्रकरणात त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. सुरवातील फरार असलेले परमबीर सिंह बऱ्याच दिवसांनी मुंबई दाखल होऊन चौकशीला सामोरे जात आहेत. त्याच्यावर खंडणी, धमकावणे, जातीवाचक शिविगाळ असे अनेक प्रकारचे आरोप झाले असून त्यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणातील चौकशीचा ससेमिरा परमबीर सिंह यांच्या मागे लागला आहे.

परमबीर सिंह यांची पोलिसांत हजेरी

परमबीर सिंह यांनी आज ठाणे पोलिसांत हजेरी लावली. ठाणे कोर्टानं त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील नॉनबेलेबल अटक वॉरंट कोर्टानं 15 हजारांच्या बॉन्डवर रद्द केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोर्टानं परमबीर सिंह यांना चौकशीत सहकार्य करण्याचेही आदेश दिले आहेत. कुठेही जेव्हा चौकशीला बोलावतील तेव्हा परमबीर सिंह कोर्टात हजेरी लावतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिलीय. परमबीर सिंह यांची प्रकृती ठिक नसल्यानं ते इतके दिवस चौकशीला गैैरहजर राहिल्याचं त्यांचे वकील राजेंंद्र मोकाशी यांनी दिली. प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे यावर जास्त बोलणार नाही, असंही ते म्हणाले.

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!

साहब, मोहल्ले के हर गली में ‘गोलिया’ मिलती है, फिर भी पुलिस कुछ नही करती, औरंगाबादेत मौलानांनी मांडली व्यथा

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI