AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीनं पळून जाऊन केलं लग्न, नंतर साक्षीदारासोबत भयंकर घडलं; कुटुंबाने पकडून…..व्हिडीओ व्हायरल!

कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे तरुण-तरुणीच्या प्रेमविवाहाला साक्षीदार राहिलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे.

मुलीनं पळून जाऊन केलं लग्न, नंतर साक्षीदारासोबत भयंकर घडलं; कुटुंबाने पकडून.....व्हिडीओ व्हायरल!
kolhapur love marriage (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)
| Updated on: Jun 19, 2025 | 6:00 PM
Share

Kolhapur Crime News : प्रेमाला जात-धर्माचं बंधन नसतं. दोन्ही प्रेमी युगुल सहमत असतील तर त्यांना लग्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांना कायद्यानुसार योग्य साक्षीदार असल्यास नोंदणी विवाह करता येतो. कोल्हापुरात मात्र सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे रजिस्टर विवाहाला साक्षीदार म्हणून सही केलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण झाली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी या व्यक्तीच्या घरी जाऊन मारहाण केलीय. हा प्रकार समोर आल्यानंतर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील तरुण आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला आहे. रजिस्टर कार्यालयात नोंदणी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी त्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती साक्षीदार म्हणून उपस्थित होती. मात्र आता याच साक्षीदाराला बुधवारी (18 जून) दुपारी मारहाण झाली. शुक्रवार पेठ येथील पोलीस चौकीजवळ हा प्रकार घडला. या मारहाणीवेळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

15 दिवसांपूर्वी केलं होतं रजिस्टर लग्न

लक्ष्मीपुरी येथील पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. जयसिंगपूर येथील तरुण आणि आटपाडी येथील तरुणीने 15 दिवसांपूर्वी रजिस्टर लग्न केलं होतं. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी आमची मुलगी बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार केली होती. या विवाहासाठी कोल्हापुरातील एक व्यक्ती साक्षीदार होती, अशी माहिती तरुणीच्या कुटुंबाला मिळाली होती. ही माहिती मिळताच तरुणीचा भाऊ काही लोकांना सोबत घेऊन साक्षीदाराच्या घरी पोहोचला आणि त्या साक्षीदाराला मारहाण केली.

पोलिसांनी पकडले नंतर सोडून दिले

या मारहाणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या मारहाणीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि साक्षीदाराला ताब्यात घेतलं. तरुण आणि तरुणीने सहमतीने लग्न केलंय, हे समोर येताच पोलिसांनी त्या साक्षीदाराला सोडून दिले. दरम्यान, आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल