कबुतराच्या पायात चिनी भाषेतील टॅग, नक्षल्यांनी हेरगिरी केल्याचा संशय

कबुतराच्या पायात चिनी भाषेतील टॅग, नक्षल्यांनी हेरगिरी केल्याचा संशय
कबुतराच्या पायात चिनी भाषेतील कोडवर्ड

छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात जामपदर येथे हा प्रकार घडला. पायात चिनी भाषेत टॅग लिहिलेले एक कबुतर सापडलं आहे (Pigeon Chinese code Chhattisgarh )

अनिश बेंद्रे

| Edited By: prajwal dhage

Apr 14, 2021 | 8:06 PM

रांची : छत्तीसगडमधील तरुणाला कबुतराच्या पायात चिनी भाषेत लिहिलेले टॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे.  याची माहिती मिळताच पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत कबुतराला ताब्यात घेतले आहे. छत्तीसगडमध्ये 250 नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षल्यांनी हेरगिरी सुरु केल्याचा संशय आहे. (Pigeon with Chinese code word tag in legs found by police in Chhattisgarh used for spy by Naxalite)

चायनिज भाषेतला मजकूर नेमका काय?

छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात जामपदर येथे हा प्रकार घडला. पायात चिनी भाषेत टॅग लिहिलेले एक कबुतर सापडलं आहे. अरुण खिलवारे यांच्या अंगणात हे कबुतर उतरले होते. विदेशी भाषेतला मजकूर बघितल्यावर तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. चिनी भाषेतील टॅग आढळल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पायावर टॅग असलेल्या कबुतराला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. चायनिज भाषेत लिहिलेला मजकूर नेमका काय आहे, हे शोधून पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

नक्षलवाद्यांकडून हेरगिरीचा संशय

कबुतरांचा वापर हेरगिरीसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नक्षलवाद्यांनी कबुतरांच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनाचे मत आहे. खरे तर विजापूर हल्ल्यानंतर सुरक्षा बलाची ताकद वाढली आहे. अशा परिस्थितीत नक्षलवादी त्यांच्या सहकार्‍यांना निरोप देण्यासाठी कबुतरांचा वापर करत असावेत, असा अंदाज आहे.

कबुतरांची निवड का?

कबूतर खूप हुशार तितकेच माणसांशी जवळीक साधणारे असतात. याच कारणास्तव कबुतरांना प्रशिक्षण देणे सोपे असते. ‘रेसिंग होमर’ नावाची कबुतराची प्रजाती खूप खास आहे. या प्रजातीच्या कबुतरांना अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाऊ शकते की ते जलद उड्डाण करु शकतील आणि गंतव्यस्थानावर पोहोचून परत येऊ शकतात.

संबंधित बातम्या :

Sukma Naxal attack: धक्कादायक! नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह सापडले

250 नक्षलवाद्यांचा हल्ला, 22 जवान शहीद, पाच तास चकमक, छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलं?

(Pigeon with Chinese code word tag in legs found by police in kondagaon Chhattisgarh used for spy by Naxalite)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें