Sukma Naxal attack: बेपत्ता जवानांपैकी 14 जणांचे मृतदेह सापडले; शहीद जवानांचा आकडा 22 वर

या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. | Sukma Naxal attack

Sukma Naxal attack: बेपत्ता जवानांपैकी 14 जणांचे मृतदेह सापडले; शहीद जवानांचा आकडा 22 वर

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत आणखी 14 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. (14 bodies recovered from the site of Sukma Naxal attack in Chhattisgarh)

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. तब्बल तीन तास याठिकाणी जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता 21 पैकी 14 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत 8 जवान शहीद झाले होते. तर 24 जवान जखमी झाले होते. यापैकी  7 जवानांची प्रकृती गंभीर आहे.

आयईडी प्लांट करण्याचा प्लान

आजतकच्या वृत्तानुसार, बिजापूर, सुकमा आणि कांकेर येथे नक्षलवाद्यांकडून सातत्याने कँप लावले जात होते. या कँपमध्ये सुमारे 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत होते. तर सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचे डिव्हिजनल कमांडर छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये राहत होते. बिजापूरमध्ये आयईडी प्लांट करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती, अशी माहितीही समोर येत आहे.

मोदींचं ट्विट

या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

तातडीची बैठक

या घटनेनंतर डीजीपी डीएम अवस्थी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती. या बैठकीत घटनेचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातमी:

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद

(14 bodies recovered from the site of Sukma Naxal attack in Chhattisgarh)

Published On - 11:44 am, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI