AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : बयो… चोर आहे की साप? बिअर शॉपच्या छोट्या काऊंटरमधून शिरला अन्…

6 जूनच्या रात्री नागपूरमधील एका बिअर शॉपमधून 25 हजार रुपये चोरीला गेले. लोखंडी ग्रिल न कापता बिअर काउंटरच्या आतून चोरी करणे जवळजवळ अशक्य होतं. पोलिसांनी जेव्हा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांचे डोळेच विस्फारले..

Nagpur Crime : बयो... चोर आहे की साप? बिअर शॉपच्या छोट्या काऊंटरमधून शिरला अन्...
लवचिक चोराचे कारनामे !Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 2:05 PM
Share

नागपूरमध्ये गुन्हे दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता चोरीचं एक असं प्रकरण समोर आलंय ज्यामुळे पोलिसही हैराण झालेत. खरंतर 6 जून रोजी नागपूरमधील एका बिअर शॉपमध्ये 25 हजार रुपयांची चोरी झाली. बिअर शॉपच्या काऊंटरला असलेले ग्रील न कापता आत घुसणं आणि चोरी करणं म्हणजे अश्कयचं होतं. पण तरीही चोर आत घुसला आणि कॅश काऊंटरमधील 25 हजार रुपये पळवले. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी शॉपमधलं सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केलं आणि ते तपासलं असता समोर जे दिसलं ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. पैशांसाठी त्या चोराने जे केलं त्याने सगळेच हैराण झाले. दुकांनातून बॉटल विक्री करणाऱ्या खिडकीतून चक्क आत घुसून चोरी करणरा भन्नाट सीसीटीव्ही फूटजे समोर आला असून अखेर त्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. शेख राजा शेख बाबा असे अटकेतील आरोपीच नाव आहे.

लवचिक चोराचे कारनामे

व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एक इसमा आधी शॉपची पाहणी करताना दिसला. काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या तरुणाने दुकानाची नीट पाहणी केली. थोड्या काळाने तो पुन्हा सीसीटीव्हीमध्य दिसला. त्याने खालून थेट काऊंटरवर उडी मारली आणि एका अरुंद जागेतून बिअर शॉपमध्ये शिरला. ज्या जागेतून ग्राहक दारूचे पैसे देतात आणि बॉटल घेतात, चोर त्याच जागेतून लवचिकपणे आत घुसला. रबरसारखे शरीर वाकवून आत गेला. आणि काऊंटर बॉक्समधून पैसे चोरल्यानंतर तो त्याच अरुंद जागेतून बाहेर पडला.

इथे पहा व्हिडीओ 

आरोपीला अटक

चोरीच्या घटनेनंतर तक्रार नोंदवल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी तपास सुरू केला असता असं दिसून आलं की वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील रामश्री बियर बारमध्ये शेख राजा शेख बाबा नावाच्या 20 वर्षीय चोराने ही चोरी केली होती. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि बेड्या ठोकल्या. अखेर त्याने चोरीची कबुली तर दिलीच, पण त्याने अमरावती येथून काही दुचाकीही चोरल्या होत्या असेही तपासात आढळून आलं.नागपूर पोलिसांच्या क्राईम युनिट ४ पथकाने अटक केली आहे.

वाठोडा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर हरीश बोराडे म्हणाले की, ही चोरीची घटना 6 जून रोजी रात्री उशिरा घडली. बिअर शॉपमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आम्ही 13 जून रोजीआरोपीला पकडले. आरोपी शेख राजा शेख बाबा हा मूळचा अमरावतीचा आहे. तो काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबासह नागपूरला आला होता. अरुंद ठिकाणी घुसून चोरी करण्यात हा चोर तज्ज्ञ आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यापासून तो शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.