प्रसुतीनंतर लगेच जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले; पत्नीचे विवाहबाह्य संबंध जाहीर करणाऱ्या पतीवरच उलट आरोप
रिपलिंग कंपनीचा संस्थापक प्रसन्न शंकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. आता पत्नीने प्रसन्नवर उलट आरोप केले आहेत.

रिपलिंग कंपनीचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्याने पत्नीवर मुलाचे अपहरण केल्याचा तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. प्रसन्नने सोशल मीडियावर पत्नीचे अफेअर असल्याचे सांगत तिच्या प्रियकरासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट केले होते. ते पाहून सर्वजण चकीत झाले होते. आता पत्नीनेच प्रसन्नवर उलट आरोप केले आहेत.
प्रसन्नची पत्नी दिव्या शशिधरनने तिच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे. तिने थेट, ‘स्वत: प्रसन्नाचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने मला देखील ओपन मॅरेज करायला भाग पाडले’ आसा खळबळजनक दावा केला आहे. ‘सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार दिव्याने तिच्यावर प्रसन्नने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच प्रसन्नने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे सांगितले आहे. त्याने वेश्यांसोबत संबंध ठेवले, तिच्यावर नजर ठेवली आणि तिचं रेकॉर्डिंगही केले. त्याने बाथरुमदेखील सोडले नाही असे दिव्या म्हणाली.
वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
प्रसुतीनंतर लगेच शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले
दिव्याने प्रसन्नच्या कर वाचवण्याच्या ट्रीक देखील सर्वांना सांगितल्या आहेत. तसेच दिव्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, प्रसुतीनंतर वेदना होत असताना देखील प्रसन्न जबरदस्ती शारीरक संबंध ठेवत होता. ‘प्रसन्न म्हणायचा की शरीर सुख ही त्याची मूलभूत गरज आहे. मी कितीही वेदनेत असले तरी मला ते करावेच लागायचे. कारण मला वाटायचे जर मी हे केले नाही तर ते बाहेर दुसरीकडे कुठेतरी जातील’, असे दिव्याने सांगितले.
काय होते प्रसन्नचे आरोप
प्रसन्न आणि दिव्याच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. त्यांना ९ वर्षांचा मुलगा आहे. तरीही दिव्याचे बाहेरील पुरुषासोबत संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तसेच ते दोघे हॉटेलमध्ये सतत भेटत असतात असे प्रसन्न म्हणाला होता. त्याने काही स्क्रीनशॉटही शेअर केले होते.
