AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

अमन अजय चड्डा यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

BREAKING | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
हर्षवर्धन जाधव
| Updated on: Dec 15, 2020 | 2:00 PM
Share

पुणे: कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांनी हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद या गुन्ह्यात आहे. (Attempt to murder case against former MLA Harshvardhan Jadhav)

अमन अजय चड्डा यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सध्या ते मनसेमध्ये आहेत. तसंच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणूनही त्यांची ओळख आहे.

तक्रारदार चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन औंधवरुन संघवी नगरकडे निघाले होते. त्यावेळी जाधव यांनी आपल्या चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्यावरुन चड्डा यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिल्यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. आपलं हृदयाचं ऑपरेशन झाल्याचं चड्डा यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतरही मारहाण सुरुच ठेवल्याचा आरोप अमन चड्डा यांनी केला आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

हर्षवर्धन जाधवांचा राजकारणातून संन्यास!

हर्षवर्धन जाधव यांनी मे महिन्यात एक व्हिडीओ संदेश जारी करुन आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली आहे. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

“मला दानवेंचा जावई म्हणू नका” माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

संजनाकडून प्रश्न सोडवून घ्या, हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, उत्तराधिकारीही जाहीर

Attempt to murder case against former MLA Harshvardhan Jadhav

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.