मोठी बातमी ! नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

मोठी बातमी ! नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी
नारायण राणे, नीलम राणे


पुणे : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. (Pune Crime Branch issues lookout notice against Narayan Rane’s Family)

राणे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होणार?

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेचं नाट्य दिवसभर रंगलं होतं. अखेर रात्री उशिरा त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आता राणे कुटुंबियांची अडचणीत वाढ करणारं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज खातं हे मुंबईचं आहे. मग पुणे पोलिसांनी कारवाई कशी केली? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, डीएचएफएलनं तक्रार दिली होती. त्यामुळे राहिलेलं कर्ज न देता राणे कुटुंब परदेशात जाऊ शकतं, त्यामुळे हे लूकआऊट सर्क्युलर देण्याचा आल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

लूकआऊट सर्क्युलर म्हणजे नेमकं काय?

लूकआऊट सर्क्युलर हे साधारणपणे नजर ठेवण्यासाठी बजावण्यात येतं. राणे कुटुंबाला बजावण्यात आलेल्या लूकआऊट सर्क्युलरमध्ये असं सांगण्यात आलं आहे. यांची अरायव्हल आणि डिपार्चरची माहिती पुणे पोलिसांना देण्यात यावी. म्हणजे तुम्ही यांच्यावर नजर ठेवून राहा अशी सूचनाच एकप्रकारे लूकआऊट सेलला देण्यात येते. याचा अर्थ असा की नितेश राणे आणि नीलम राणे कुठे जात आहेत? कुठून आले? याची सर्व माहिती पुणे पोलिसांना द्यावी लागेल. थोडक्यात हे लोक कुठेही प्रवास करत असतील तर त्याची माहिती विमानतळाकडून देण्यात येणं गरजेचं असतं.

इतर बातम्या :

आधी 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आता अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पुण्यात नेमकं चाललंय काय?

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वरच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? किरीट सोमय्यांचा सवाल

Pune Crime Branch issues lookout notice against Narayan Rane’s Family

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI