AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : हायटेक चोरी ! गुगलवर शोधून घरफोडी करायचा, 300 सीसीटीव्ही तपासून अट्टल चोरट्याला बेड्या

गुगलवर शोधून उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. एक-दोन नव्हे तर तब्बल 300 सीसीटीव्हींचे फुटेज तपासूनन पोलिसांनी मोठी कारवाई करत तेलंगणमधून त्या चोराला बेड्या ठोकल्या

Pune Crime : हायटेक चोरी ! गुगलवर शोधून घरफोडी करायचा, 300 सीसीटीव्ही तपासून अट्टल चोरट्याला बेड्या
| Updated on: Dec 20, 2023 | 10:19 AM
Share

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 20 डिसेंबर 2023 : पुण्यात सध्या गुन्हेगारांचे फावले आहे. सतत काही ना काही गुन्ह्यांच्या घटना कानावर येतच असतात. त्यातच प्रगत तंत्रज्ञानाचा वापरही गुन्हेगार करताना दिसत आहेत. अशीच हायटेक चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 300 सीसीटीव्हींचे फुटेज तपासूनन पोलिसांनी मोठी कारवाई करत तेलंगणमधून त्या चोराला बेड्या ठोकल्या.

या चोराने गुगलवरून माहिती शोधून येरवडा आणि चतु:श्रृंगी परिससरातील उच्चभ्रू सोसायटींमध्ये घरफोड्या करत लाखोंचा ऐवज पळवला होता. अखेर येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने तपास करून त्या चोरट्याला तेलंगणमध्ये जाऊन अटक केली. नरेंद्र बाबू नूनसावत (वय 27) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तेलंगणा (Telangana), हैदराबाद (Hyderabad), तिरुपति (Tirupati), चेन्नई (Chennai) या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नरेंद्र याने इतर दोन साथीदारांसह येरवडा व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले घर फोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले . पोलिसांनी आरोपीकडून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ऑक्टोबर महिन्यात कल्याणी नगर येथील बंद बंगला फोडोन लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम पळवण्यात आली होती. या गुन्ह्यासंबंध पोलिस तपास करत असतानाच महिन्याभराने चतु:श्रृंगी येथे दोन ठिकाणी घरफोडी होऊन तेथेही 50 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारण्यात आला. अखेर याप्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यासाठी त्यांनी तब्बल 300 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेलंगणा येथे जाऊन नरेंद्र नुनसावत याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्याने त्याने हे गुन्हे त्याचे साथीदार सतिश बाबू करी (रा. तेलंगणा) व गुरुनायक केतावत (रा. हैदराबाद, तेलंगणा) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

चोरीपूर्वी गुगलवर करायचे सर्च

आरोपी मोठ्या शहरामध्ये जाऊन इंटरनेटवरुन उच्चभ्रू भागातील माहिती शोधायचे एरिया सर्च करत होते. त्यावरुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे परिसरात रेकी करुन रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे आरोपीने सांगितले. आरोपींनी अशाच प्रकारे भोसले नगर येथे घरफोडी केल्याचीही कबुली दिली. सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे, अमजद शेख, आणि सागर जगदाळे यांनी कामगिरी केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.