AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं, तोंडात काठी कोंबली… प्रकरण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला

पुण्यातील कोंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं, तोंडात काठी कोंबली... प्रकरण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला
Image Credit source: AI Image
| Updated on: May 25, 2025 | 5:15 PM
Share

पुण्यातील कोंढवा परिसरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जुन्या मित्राला चहासाठी घरी बोलावून त्याच्याविरुद्ध भयानक कट रचला. प्रथम मोठ्या आपुलकीने मित्राला घरी बोलावलं आणि तो घरात येताच महिलेने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. मिरचीमुळे डोळे झोंबायला लागल्यामुळे त्याला दिसणे बंद झाले. पण या महिलेने हे सर्व का केलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

तिघे साथीदारही पोहोचले

महिलेने मित्रावर हा हल्ल्या केल्यानंतर तिचा पती आणि इतर दोन साथीदार घरी आले. ते बराचवेळ हे सर्व घडण्याची वाट पाहात होते. चौघांनी मिळून पीडिताला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्या तोंडात काठी कोंबली आणि हात-पाय दोरीने घट्ट बांधले गेले. या घटनेवरून स्पष्ट होते की हे सर्व काही आधीच नियोजित होते. वाचा: सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला

खंडणीसाठी रचला गेला संपूर्ण कट

पीडिताला हे सर्व पूर्णपणे असहाय्य होत होते. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. हे प्रकरण केवळ हल्ल्याचे नव्हे, तर सुनियोजित अपहरण आणि पैशांची मागणी यांच्याशी संबंधित होते. ही बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता तात्काळ कारवाई केली. अवघ्या चार तासांत त्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि या चार आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींची ओळख

अटक केलेल्यांमध्ये महिला सोनल उर्फ सोनी रायकर (वय 35), तिचा पती अतुल रायकर (वय 38) आणि त्यांचे दोन साथीदार रवी मंडल (वय 24) व सुशांत हान (वय 31) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. पीडित व्यक्तीचे वय 39 वर्षे आहे आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जुनी मैत्री ठरली धोकादायक

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि पीडित यांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. दोघांमध्ये आधीपासूनच ओळख होती, याच विश्वासावर तो कोणताही संशय न बाळगता तिच्या घरी चहासाठी गेला होता. पण या विश्वासाचा असा भयंकर अंत होईल, याचा कोणीही विचार केला नव्हता.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी