बलात्काराच्या 4 घटनांनी महाराष्ट्र हादरला, पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बलात्काराच्या चार घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवड, अमरावती आणि वसईतही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बलात्काराच्या 4 घटनांनी महाराष्ट्र हादरला, पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 1:30 PM

पुणे : बलात्काराच्या चार घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवड, अमरावती आणि वसईतही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींना अटक करुन तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. (4 Rape cases in Maharashtra : Mumbais sakinaka, Pimpri chinchwad teacher, Amravati minor girl and vasai virar mentally retarded girl raped)

मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडितेचा मृत्यू

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

पिंपरीत पोलीस असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार

तिकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

आरोपी विकास अवस्थीने पीडित महिलेला दुचाकीवरून घेऊन जात होता. त्यावेळी पीडित महिलेने प्रतिकार केला. पण तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सांगवी पोलीस स्टेशन मध्ये तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त विकास अवस्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती राहिली. मा६ बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

वसईत अल्पवयीन मतिमंद मुलीवर अतिप्रसंग

वसईत 16 वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अतिप्रसंग झाला आहे. वासनांध आरोपीने राहत्या घराच्या परिसरातून मुलीला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून, अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 11 या वेळेत वालीव पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली असून दोन दिवसानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघड झाली आहे.

तक्रार दाखल होताच विरार गुन्हे शाखा कक्ष 03 च्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात 31 वर्षाच्या वासनांध नाराधमाला नालासोपारा पूर्व संतोषभूवन परिसरातील अण्णाडीस कम्पाउंड येथून अटक केले आहे. आरोपी हा बिगारी काम करणारा असून, नशेच्या नादात हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

याबाबत वालीव पोलीस ठाण्यात भादवी कलम 376 (2),(के),(एम), 366 (अ), सह बाल लैंगिक अधिकार संरक्षण कायदा अधिनियम 2012 चे कलम 4,6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : मुंबईतील बलात्कार पीडितेचा मृत्यू

संबंधित बातम्या  

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.