AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी बदला घेतलाच, भरदिवसा जे घडले ते पाहून पुणेकर हादरले !

मयत युसूफ हा दुपारच्या सुमारास घरी जेवायला चालला होता. यावेळी आरोपीपैकी एकाने युसूफच्या रिक्षाला हात दाखवला आणि वाकी जवळ जाऊन पुन्हा यायचे आहे असे सांगितले.

शेवटी बदला घेतलाच, भरदिवसा जे घडले ते पाहून पुणेकर हादरले !
पूर्ववैमनस्यातून चाकणमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: TV9
| Updated on: Oct 11, 2022 | 5:10 PM
Share

सुनिल थिगळे, TV9 मराठी, चाकण : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या (Auto Driver Murder) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan Pune) येथे घडली आहे. युसुफ अर्षद काकर असे हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या तक्रारीनुसार चाकण पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

प्रणव ऊर्फ पन्या संजय शिंदे, साहिल दत्ताशिंदे, आनंदा ऊर्फ अण्णा तांडव, हनुमंत कोरमशेट्टी, निशान देवेंद्र बोगाती, अतुल अर्जुन तांबे, रितेश परमेश्वर घोडके, यश अनिल जगताप, कुलदिप जोगदंड, कृष्णा सुनिल भंडलकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रिक्षा भाड्याने पाहिजे सांगून तरुणाला नेले

मयत युसूफ हा दुपारच्या सुमारास घरी जेवायला चालला होता. यावेळी आरोपीपैकी एकाने युसूफच्या रिक्षाला हात दाखवला आणि वाकी जवळ जाऊन पुन्हा यायचे आहे असे सांगितले. युसूफने हे भाडे स्वीकारले आणि रिक्षा वाकीच्या दिशेने घेऊन निघाला.

घटनास्थळी पोहचताच आधी तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली

रिक्षा चाकण-रोहकल रस्त्याच्या असलेल्या बैलगाडा घाटाजवळ येताच त्या ठिकाणी आधीच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी युसुफच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने युसुफ घाबरुन रिक्षा सोडून पळू लागला.

तरुणावर जीवघेणा हल्ला करत हत्या

मात्र डोळ्यात मिरची पूड गेल्याने त्याला पुढे काही दिसत नसल्याने तो अधिक पळू शकला नाही. याचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युसुफचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त

घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि लाल मिरची पावडर जप्त केली आहे.

हत्येचा बदला घेण्यासाठी हत्या

पूर्व वैमनस्यातून रोहित सहानी या तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेने चाकण परिसरात खळबळ माजली आहे.

चाकण परिसरात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. अनेक गुन्हे चाकण परिसरात घडत असल्याने ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान चाकण पोलिसांसमोर उभे आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.