AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जायचं होतं गुजरातला आणि पोहचला डोंबिवलीत, रस्त्यावर बोट पाहून डोंबिवलीकर चक्रावले !

डोंबिवलीतील रेतीबंदरहून एक बोट घेऊन कंटेनर गुजरातच्या दिशेने निघाला. कंटेनरच्या चालकाने रस्ता कळावा म्हणून जीपीएसही सुरु केलं. मात्र या जीपीएसनेच चालकाला गंडवलं आणि गुजरातला निघालेली बोट डोंबिवली शहरात पोहचली.

जायचं होतं गुजरातला आणि पोहचला डोंबिवलीत, रस्त्यावर बोट पाहून डोंबिवलीकर चक्रावले !
जायचं होतं गुजरातला आणि पोहचला डोंबिवलीतImage Credit source: Google
| Updated on: Oct 11, 2022 | 6:18 PM
Share

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातून गुजरातला जाणारी बोट (Boat) डोंबिवली शहरात घुसली आणि एकच कल्लोळ माजला. ही बोट घेऊन जाणारा कंटनेर (Container) डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर अडकला आणि वाहतुकीचा पुरता बोजवाराच उडाला. रस्त्यावर बोट आल्याचे कळताच डोंबिवलीत एकच चर्चा सुरु झाली. बोटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on Social Media) झाले आणि ज्याच्या त्याच्या तोंडी एकच चर्चा रंगू लागली ती या बोटीची.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील रेतीबंदरहून एक बोट घेऊन कंटेनर गुजरातच्या दिशेने निघाला. कंटेनरच्या चालकाने रस्ता कळावा म्हणून जीपीएसही सुरु केलं. मात्र या जीपीएसनेच चालकाला गंडवलं आणि गुजरातला निघालेली बोट डोंबिवली शहरात पोहचली.

सदर कंटेनर डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदरहून गुजरातला जायला निघाला. मात्र शिळफाटा रोडकडे जाण्याऐवजी चुकून डोंबिवली पूर्वेतील गावदेव परिसरात घुसला. चालक या परिसरातील नसल्याने तो रस्ता चुकला.

पूर्वेतील गावदेवी मंदिरजवळ रस्ते अरुंद असल्याने ही बोट घेऊन जाणारा कंटेनर अडकला. एवढी मोठी बोट इथे कशी आली असा सवाल नागरिकांना पडला आणि याच बोटीची तुफान चर्चा डोंबिवलीकरांमध्ये सुरु झाली.

डोंबिवलीतील रेतीबंदर परिसरात गावदेवी मंदिराजवळ एक कंटेनर अडकल्याची माहिती रविवारी पहाटे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी एका मच्छिमाराची बोट डोंबिवली पश्चिम रेतीबंदरकडून गुजरात येथे घेऊन जात असताना रस्ता चुकल्याने कंटेनर डोंबिवली पूर्वेत घुसल्याचे कळले.

कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

कंटेनर अरुंद रस्त्यावर अडकल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. टिळकनगर पोलिसांनी लगेचच माहिती मिळता घटनास्थळी जाऊन कंटेनर चालकावर कारवाई करत कलम 283 अंतर्गत गुन्हा दाखल केला. याशिवाय वाहतूक नियमाप्रमाणे अडथळा निर्माण करण्याचे गुन्हेही दाखल केले आहेत.

दरम्यान आज पहाटे ही बोट रवाना केली असून यासाठी रस्त्यावर लावलेल्या राजकीय मंडळींच्या गणपती आणि नवरात्री शुभेच्छा देणाऱ्या काही कमानी सुद्धा काढल्या. त्यामुळे या बोटीची चर्चा आता रंगू लागली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.