AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया गॅस लीक, 17 कर्मचारी रुग्णालयात

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बैचनी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरीत कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरु असल्याचे लक्षात आले. त्या झाल्यानंतर मुख्य रेग्यूलेटर त्वरीत बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा दुर्घटना घडली असती.

Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया गॅस लीक, 17 कर्मचारी रुग्णालयात
पुण्यात अमोनिया गॅस लीक
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 08, 2024 | 10:58 AM
Share

Pune Food Factory: पुणे शहराजवळ असलेल्या यवत येथील एका कंपनीत धोकादायक प्रकार घडला. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग यूनिटमध्ये ही घटना घडली.

कंपनीत 25 जण काम होते कार्यरत

पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितले की, रेडी-टू-ईट खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत अमोनिया गॅसचा वापर केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी 18 डिग्री सेल्सियस तापमान ठेवले जाते. त्या कारखान्यात घटना घडली तेव्हा 25 जण काम करत होते. त्यातील 17 जण अमोनिया गॅसची गळती होणाऱ्या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास होऊ लालगा. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बैचनी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरीत कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरु असल्याचे लक्षात आले. त्या झाल्यानंतर मुख्य रेग्यूलेटर त्वरीत बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा दुर्घटना घडली असती. त्यामुळे मोठा धोका टळला. अमोनियाचा त्रास झालेल्या 17 पैकी 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेवर उपचार सुरु आहे. तिची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या टीमने कंपनीत जाऊन गॅस लीक होण्याच्या प्रकरणाची तपासणी केली. तसेच कंपनीत करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा