AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई, कोंढवा परिसरात 3788 सिम कार्ड अन्…22 वर्षाच्या तरुण ताब्यात

ats action in pune: पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई, कोंढवा परिसरात 3788 सिम कार्ड अन्...22 वर्षाच्या तरुण ताब्यात
पुण्यात एटीएसने जप्त केलेले साहीत्य.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 29, 2024 | 2:52 PM
Share

पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

का उभारले बनावट टेलिफोन एक्सचेंज

पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपणीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

कुठे सुरु होता प्रकार

कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड एटीएसला मिळाले. तसेच सात सिम बॉक्स, वायफाय इतर साहित्य पोलिसांना मिळाले. कोंढव्यात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुण्यातील कोंढवा भाग संवेदनशील आहे. या ठिकाणी अनेक दिवस अतिरेकी राहत होते. सीमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित अतिरेकी राहत असताना तपास यंत्रणांना त्याची माहिती मिळाली नाही. अखेर पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणात आरोपी मिळाले. त्या आरोपींची चौकशी केल्यावर ते दहशतवादी निघाले. आता नौशाद अहमद सिद्धी याचा त्या दहशतवाद्यांशी संबंध आहे का? या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन