AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना विरोधात पुण्यात तक्रार ; बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

कंगना वृत्तवाहिनीवर अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना वाहिनीचे प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालक यापैकी कुणीही तिला थांबवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कंगना इतकेच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका नाविका कुमार यांचाही तितकाच सहभाग आहे. हे कृत्य अतिशय दुर्देवी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाची विटंबना आहे

कंगना विरोधात पुण्यात तक्रार ; बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kangana Ranaut
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 12:37 PM
Share

पुणे – अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी,  पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे बेकायदेशीर असामाजिक कृत्य आहे . त्यामुळे तिच्या विरुद्ध बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत (U.A.P.A.) १९६७ तसेच कलम १५३ ब व २४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदवावा. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते व चित्रपट निर्माते निलेश नवलाख यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. कंगना राणावत यांना दिलेला पद्म पुरस्कार परत घ्यावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पात्र पाठवण्यात आले आहे. कंगनाने लेखी माफी मागितली तर तिला क्षमा सुद्धा केली जाईल अन्यथा उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती निलेश नवलाखा यांनी दिली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबरोबरच पत्रकार नाविका कुमार व टाइम्स नाउ वृत्तवाहिनीवरही गुन्हा नोंदवाण्याची मागणी करण्यात आली आहे.

वृत्तवहिनींच्या पत्रकारावरही गुन्हा दाखल करावा

कंगना वृत्तवाहिनीवर अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना वाहिनीचे प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालक यापैकी कुणीही तिला थांबवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कंगना इतकेच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका नाविका कुमार यांचाही तितकाच सहभाग आहे. हे कृत्य अतिशय दुर्देवी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाची विटंबना आहे ,प्रतिपादन निलेश नवलखा यांनी आपल्या तक्रारीत केले आहे.  कंगना रणावत हिचे वक्तव्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचे गंभीर प्रकरण आहे.

”अग्रेजोसे मिली वह आझादी नही थी, वह भिक थी और आझादी २०१४ मे मिली है”, असे वक्तव्य कंगनाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर कंगनाच्या या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

कंगना व नाविका कुमार आणि टाइम्स नाऊ वाहिनी यांनी एकत्रितपणे भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(ब) च्या अंतर्गत गुन्हा ठरणारे कृत्य केले आहे. पत्रकार नाविका कुमार यांच्या अनैतिक पत्रकातेविरोधात कारवाई करावी यासाठी न्यूज ब्रॉंडकास्टिंग स्टँडर्डस अथोरीटी (NATIONAL BROADCASTING STANDARDS AUTHORITY – NBSA) यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा

गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर , वाचा ठार झालेल्यांची संपूर्ण यादी

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

Maharashtra News LIVE Update | कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.