Pimpri Chinchwad crime| मी आळंदीच्या भाई , तू माझ्या पुढे का नाचतोस म्हणत… ; दोन टोळक्यात तुफान हाणामारी

मी आळंदीच्या भाई आहे .अन तुम्ही माझ्या पुढं नाचताच कसं असे म्हणत प्रज्वल व ओंकार सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीचे रूपांतर भांडणात झाले. यातूनच पुढे दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये प्रज्वल मकेश्वर आणि ओंकार यांना जबर मार लागून ते जखमी झाले

Pimpri Chinchwad crime|  मी आळंदीच्या भाई , तू माझ्या पुढे का नाचतोस म्हणत... ; दोन टोळक्यात तुफान हाणामारी
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 4:13 PM

पिंपरी-  शहरात  गुन्हेगारीच्या(crime) वाढत्या घटना पोलिसांसाठी डोके दुखी ठरत आहेत. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad)दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रज्वल मकेश्वर व, ओंकार गाडेकर अशी जखमीची नावे आहेत . याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण 20 जणांवर खुनाचा प्रयत्न आणि मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. काही पूर्वीही स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून गाव गुंडाच्या टोळक्याने कोयता, नंग्या तलवारी घेऊन आराडारोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

तर झाल असं की

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद कोल्हे याने कॅफेच्या सुरु केला आहे. या कॅफेच्या उदघाटनासाठी दोन्ही गटातील तरुणांना प्रसादने बोलवले होते. दोन्ही गटातील तरुणाचा कॉमन मित्र प्रसाद असल्याने र आरोपी व या पीडित दोघेही कार्यक्रमाला आले होते. याचवेळी जखमी प्रज्वल मकेश्वर आणि ओंकार नाचत होते. त्या दरम्यान दुसऱ्या ग्रुपमधील ज्ञानेश्वर बडगेयाने मी आळंदीच्या भाई आहे .अन तुम्ही माझ्या पुढं नाचताच कसं असे म्हणत प्रज्वल व ओंकार सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीचे रूपांतर भांडणात झाले. यातूनच पुढे दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये प्रज्वल मकेश्वर आणि ओंकार यांना जबर मार लागून ते जखमी झाले. त्या दोघांनाही पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटना स्थळावर दाखल होत त्यांनी आरोपीना ताब्यात घेतले. मात्र घटनेतील काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्याचाशोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Scrappage Policy अंतर्गत होणाऱ्या वाहनांच्या फिटनेस टेस्टचे फायदे काय? जाणून घ्या सर्वकाही

रामकुंडात स्वच्छ पाणी गेल्याशिवाय नाशिक स्मार्ट होणार नाही – Chhagan Bhujbal

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.