CCTV Video : पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती. काही कारणावरून आरोपी आणि मयत तरुण यांच्यात भांडण झाले होते.

CCTV Video : पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
मयत अक्षय वल्लाळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:36 PM

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. या तरुणा (Youth)वर अवघ्या 30 सेकंदात कोयत्याने 35 वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील समर्थ नगर पोलीस स्टेशन हद्दीततील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) आहे. याप्रकरणी समर्थ नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नाना पेठ परिसरातील नवावाडा परिसरात राहतात. मयत अक्षय वल्लाळ हा त्याच परिसरात राहतो. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती. काही कारणावरून आरोपी आणि मयत तरुण यांच्यात भांडण झाले होते. यामुळे आरोपींचा अक्षयवर राग होता. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात देखील वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (In Pune a social activist was killed due to an old dispute, the thrilling incident was caught on CCTV)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.