Pune Crime : धक्कादायक ! नरबळीसाठी साडे तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुखरुप सुटका

रणजीत जाधव

रणजीत जाधव | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jul 24, 2022 | 6:05 PM

सीसीटीव्ही फुटेजमुळे मुलीला शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहचत 10 तासाच्या आत मुलीची सुटका केली.

Pune Crime : धक्कादायक ! नरबळीसाठी साडे तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुखरुप सुटका
धक्कादायक ! नरबळीसाठी साडे तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण
Image Credit source: TV9

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नरबळी देण्याच्या उद्देशाने साडे तीन वर्षीय मुलीचे अपहरण (Kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली घडला आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगात सूत्रे हलवत मुलीची सुखरुप सुटका (Rescued) केली आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक (Arrest) करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. आरोपींमध्ये विमल संतोष चौगुले (28 रा. जुन्नर पुणे), संतोष मनोहर चौगुले (41 रा. जुन्नर), सुनिता अशोक नलावडे (40 रा. ताम्हणे वस्ती चिखली), निकिता अशोक नलावडे (22) आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी शेजारी आहेत

पीडित मुलीचे कुटुंबीय आणि मुख्य आरोपी सुनिता नलावडे हे शेजारी राहतात. यामुळे मुलीशी त्यांची जवळीक होती. याचाच फायदा घेत आरोपींनी मुलीच्या अपहरणाचा कट रचला. श्री संत तुकाराम हौसिंग सोसायटी ताम्हणे वस्ती येथून साडेतीन वर्षाच्या मुलीस कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार मुलीची आई तारा राजा शेख (30) हिने चिखली पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत मुलीचा तपास सुरु करण्यात आला. अपहृत मुलगी ही साडेतीन वर्षाची असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून सदर बाबत वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली. गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त डोळे,पोलीस उपायुक्त झोन 2 भोईटे, एसीपी अमृतकर, एसीपी भोसले पाटील, एसीपी घनवट तसेच क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 1 वपोनि काटकर आणि टीम, युनिट क्रमांक 2 वपोनि नांदुरकर आणि टीम, युनिट क्रमांक 4 वपोनि पंडित आणि टीम, दरोडा प्रतिबंधक पथक वपोनि इंगोले साहेब आणि टीम, गुंडविरोधी पथक एपीआय माने आणि टीम, युनिट क्रमांक 5 पीएसआय कोळी आणि टीम तात्काळ घटनस्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींना अटक

उपस्थित वरिष्ठ अधिकारी यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून तपासाला सुरवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमुळे मुलीला शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहचत 10 तासाच्या आत मुलीची सुटका केली. सर्व आरोपींना अटक करत त्यांची चौकशी केली असता अमावस्येच्या दिवशी नरबळी देण्यासाठी मुलीचे अपहरण केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली. मात्र हा नरबळी कोणत्या कारणासाठी देण्यात येणार होता, हे अद्याप कळू शकले नाही. पिंपरी-चिंचवड पोलिस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. चौकशीअंती नरबळीचे कारण स्पष्ट होईल. (Kidnapped three and a half year old girl rescued safely by Pimpri Chinchwad police)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI