Pimpri- Chinchwad crime| प्रियसीची हत्या करत प्रियकरानं बनाव रचला आत्महत्येचा ; …पण पोलिसांनी पर्दाफाश करत ठोकल्या बेड्या

आरोपी हेमंतने मृत तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र तरुणीने लग्न करण्यास नकार दिला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपी हेमंतने सपनाचा बाथरूममध्ये स्कार्फने गेला आवळला.

Pimpri- Chinchwad crime| प्रियसीची हत्या करत प्रियकरानं बनाव रचला आत्महत्येचा ; ...पण पोलिसांनी  पर्दाफाश करत ठोकल्या बेड्या
प्रातिनिधीक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 19, 2021 | 11:10 AM

पिंपरी- लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून प्रियसीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत प्रियकराने पोलिसांना प्रियसीने आत्महत्या केल्याची खोटीमाहिती दिली. मात्र शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गेला आवळल्याने खून झालेचे स्पष्ट झाले. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले मृत तरुणी व आरोपी हेमंत अशोक मोहिते (वय 29) यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही घटनेच्या आदल्यादिवशी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले होते. हॉटेलमधील रूम न. 301 मध्ये दोघे थांबले होते. यादरम्यान आरोपी हेमंतने मृत तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र तरुणीने लग्न करण्यास नकार दिला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपी हेमंतने सपनाचा बाथरूममध्ये स्कार्फने गेला आवळला.

असा झाला उलगडा प्रियसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने तिने आत्महत्या केल्याचा बनव रचत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रियकराकडे चौकशी केली असता त्याने तिने आत्महत्या केल्याचेच सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालात पोलिसांचा संशय खरा ठरला व आरोपी प्रियकराचा बनाव उघडा पडला. घटना स्थळावर पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना बाथरुमच्या खिडकीची काचही फुटलेली आढळली. याप्रकरणी आरोपी हेमंत मोहिते याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहे. मृत प्रेयसी सपना आणि हेमंत मूळ वाशी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 4: ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन झटके, इंग्लंड कमबॅक करेल ?

Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें