लहान मुलांच्या भांडणाचे कारण, पिंपरीतील उच्चभ्रू वसाहतीत भाडोत्री गुंडांना बोलावून शेजाऱ्यांना मारहाण

गुंडांनी जीवे मारुन टाकू अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्याची तक्रार सुरवसे यांनी दिघी पोलिस स्थानकात केली आहे. दिघीतील औरम वाटिका वसाहतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

लहान मुलांच्या भांडणाचे कारण, पिंपरीतील उच्चभ्रू वसाहतीत भाडोत्री गुंडांना बोलावून शेजाऱ्यांना मारहाण
पुण्यात भाडोत्री गुंडांकडून शेजाऱ्याला मारहाण
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 3:02 PM

पिंपरी चिंचवड : उच्चभ्रू वसाहतीमध्ये गुंड बोलवून शेजाऱ्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील दिघी भागात घडला आहे. शरद चव्हाण नावाच्या व्यक्तीने लहान मुलांच्या भांडणाचे कारण सांगून भाडोत्री गुंड बोलावत विजयकुमार सुरवसे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

घरातील महिलांनाही मारहाण केल्याचा दावा

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील दिघी भागात रविवारी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गुंडांनी घरातील महिलांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी विजयकुमार सुरवसे यांनी केला आहे. त्याच्यासोबत निखिल वासने या शेजाऱ्यालाही मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी

गुंडांनी जीवे मारुन टाकू अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्याची तक्रार सुरवसे यांनी दिघी पोलिस स्थानकात केली आहे. दिघीतील औरम वाटिका वसाहतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

भांडणाचं कारण काय?

आरोपी शरद चव्हाण यांच्या मुलीकडून फिर्यादी विजय सुरवसे यांच्या मुलीला धडक लागली होती. त्यामुळे तिला माफी मागायला लावली. त्यानंतर ती आजारी पडल्याचे कारण देत आरोपीने फिर्यादी यांना घरात घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा

दुसरीकडे, घरासमोर वाळत घातलेल्या ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात 38 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. हिंजवडी पोलिसांनी हत्येचा तपास करत शेजाऱ्याला अटक केली.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडत हिंजवडीमधील साखरे वस्ती भागात 3 ऑक्टोबर रोजी संतोष माने या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करुन संतोषची हत्या करण्यात आली होती. पत्नी सरस्वती माने यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हिंजवडी पोलिसांनी खुनाचा उलगडा करत शेजारी राहणाऱ्या 23 वर्षीय कैलास डोंगरे याला अटक केली आहे.

हत्येचा उलगडा कसा झाला?

सुरुवातीला आजूबाजूच्या व्यक्तींकडे चौकशी केली असता नवीन कोणाीच आलं नसल्याचं समजलं. त्यामुळे कोणी आणि का संतोषची हत्या केली, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस तपास करत असताना शेजारी राहणाऱ्या घरासमोर कपडे वाळत घालण्यात आले होते, त्यात केवळ अंतर्वस्त्र ओले असल्याने पोलिसांना शंका आली.

ओल्या अंडरवेअरमुळे पोलिसांना शंका

घरातील सर्व कपडे वाळलेले असताना केवळ एक अंडरवेअर ओली का? या मुलाने इतक्या रात्री आंघोळ का केली असेल? असा प्रश्न सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारणे यांना पडला. त्याचा कसून तपास केला असता आरोपीने खुनाची कबुली दिली.

शेजाऱ्यांच्या भांडणातून हत्या

मयत संतोष माने आणि त्याची पत्नी सरस्वती माने यांचे आरोपी कैलास डोंगरेच्या आई वडिलांबरोबर सातत्याने भांडण होत असे. या कारणावरुन आपण त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

संबंधित बातम्या :

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, हिंजवडी पोलिसांची भन्नाट कामगिरी

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

पुण्यात पती-पत्नीची हत्या, आर्थिक वादातून धारदार शस्त्राने वार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.