Pune | लेकरासह पत्नीचे प्राण वाचवूनच जीव सोडला, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून पित्याचा मृत्यू

Pune | लेकरासह पत्नीचे प्राण वाचवूनच जीव सोडला, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून पित्याचा मृत्यू
पवना धरण परिसरात बुडून एकाचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9

पलिकडे जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि नदीपात्रामध्ये गाळ असल्यामुळे तो यात रुतला. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने पत्नी आणि लहान मुलाला दूर ढकलून देत त्यांचे प्राण वाचवले

रणजीत जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 27, 2022 | 8:26 AM

पिंपरी चिंचवड : पवना धरणाच्या बॅकवॉटर (Pawna Backwater) परिसरात बुडून (Drown Death) एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राम लक्ष्मण पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) मावळ तालुक्यात हा प्रकार घडला. पलिकडच्या बाजूला जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि नदी पात्रामध्ये गाळ असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. मयत पिता नदी पात्रातील गाळात रुतला होता. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने पत्नी आणि लहान मुलाला दूर ढकलून दिलं आणि त्यांचे जीव वाचवले, त्यानंतर त्याने स्वतःचे प्राण सोडले. या घटनेने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांच्या टीमने शोध सुरु केला. मात्र काही तासाच्या अंतराने राम पवार यांचा मृतदेह सापडला.

नेमकं काय घडलं?

राम पवार हे आपला लहान मुलगा आणि बायको यांच्यासह पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामधून पलिकडे जात होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि नदीपात्रामध्ये गाळ असल्यामुळे ते यात रुतले. यावेळी त्याच्या खांद्यावर लहान मुलगा होता, तर सोबत असलेल्या पत्नीचा हात हातात धरला होता. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी पत्नी आणि लहान मुलाला दूर ढकलून दिलं आणि त्यांचे प्राण वाचवले. या घटनेने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Goa | जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Pune | मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

किस्सा नहीं, कहानी बन गई; शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस, अमरावतीच्या जोडगोळीचा बुडून मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें