AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime| काय म्हणावं याला ! पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरु

पुणे – जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात पिस्तूल वापराच्या परवान्यासाठीच्या मागणीत वाढ होताना दिसत आहेत. पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळवण्यासाठीही अनेकजण धडपड करताना दिसून येत आहेत. अशातच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पिस्तुल बाळगण्याचा परवाना मिळावा यासाठी थेट स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचेची चर्चा तालुक्यता रंगली आहे. तर झाले असे […]

Pune Crime| काय म्हणावं याला ! पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरु
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 11:34 AM
Share

पुणे – जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात पिस्तूल वापराच्या परवान्यासाठीच्या मागणीत वाढ होताना दिसत आहेत. पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळवण्यासाठीही अनेकजण धडपड करताना दिसून येत आहेत. अशातच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पिस्तुल बाळगण्याचा परवाना मिळावा यासाठी थेट स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचेची चर्चा तालुक्यता रंगली आहे.

तर झाले असे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावच्या अतिउत्साही सरपंचावर काही महिन्यापूर्वी रस्त्यावर खुनी हल्ला झाल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल झाली होती. त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित सरपंच स्वतःच्या चारचाकी वाहनाने रात्रीच्या वेळी घरी परतत होता. त्याचवेळी अचानक समोरुन दोन दुचाकीवर चौघेजण आले. त्यांनी चाराचाकी वाहनाला आपल्या दुचाकी आडव्या लावल्या. त्यानंतर दगडाने चारचाकीच्या काचा फोडता त्यांनी  पिस्तुल सरपंचावर रोखले . मात्र सरपंचाने चारचाकी वेगात पळवत स्वतःचा जीव वाचावला. असे त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कुठेही जखम नाही,  मग हल्ला कसा झाला? अज्ञातांनी सरपंचावर हल्ला केला. मात्र यात सरपंचाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यांना साधेकुठेही खरचटलेलेही दिसून आलेली नाही. इतके झाल्यावर शिवाय हल्लेखोर फक्त काच फोडून शांतपणे निघून गेले का? रात्री दहा वाजता घटना घडली मात्र जवळ लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी ही वाहने पाहिली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. गेले अडीच महिने तपास केला मात्र पोलिसांना संशयास्पद काहीच मिळून आलेले नाही. त्याबाबत पोलीस काही सांगत नाहीत. मुळात आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा तथाकथित बनाव केला होता. असे लोक तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणी बोलत आहेत. सरपंचाने काही दिवसांपूर्वी रीतसर पणे पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता. सहजरित्या आपल्याला हा परवाना मिळावा यासाठी हा सरपंचानेच हा बनाव रचल्याची चर्चा दबक्या आवाजात गावात सुरु आहे.

तपास सुरु आहे या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. परंतु अडीच महिन्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचे धागेदोरे मिळालेले नाहीत. आतापर्यंत या तपासात काहीच निष्पन्न झाले नाही. प्रकार घडण्यापूर्वी तक्रारदाराचा पिस्तुल परवाण्यासाठी अर्ज दाखल असल्याचे समजते. अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी या दिली आहे.

Vinayaka Chaturthi 2021 | मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची विनायक चतुर्थी म्हणजे नक्की काय?, जाणून घ्या तिथी आणि शुभ वेळेपर्यंत सर्व काही

पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.