AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कॉन्टेबलची पबमध्ये पार्टी, फोटो ट्विट करत रवींद्र धंगेकर यांचा पुणे पोलीस आयुक्तांवर घणाघात

Pune ravindra dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे बिघडवणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करावी. त्याला निलंबित करा, अन्यथा ४८ तासांत त्याचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील, असे म्हटले आहे.

पोलीस कॉन्टेबलची पबमध्ये पार्टी, फोटो ट्विट करत रवींद्र धंगेकर यांचा पुणे पोलीस आयुक्तांवर घणाघात
ravindra dhangekar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 24, 2024 | 3:19 PM
Share

पुणे येथील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाची देशभरात चर्चा सुरु आहे. या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रसार माध्यमे, सामाजिक संघटना आणि विरोधकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूमिका मांडली. त्यांनी पुणे पोलिसांवर कुठलाही दबाव नव्हता, कायद्यानुसार जे जे शक्य होते, ती सर्व प्रक्रिया केली असल्याचे म्हटले होते. पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केले आहे. त्यात पुणे पोलीस कॉन्सटेबल पबमध्ये पार्टी करतानाचा फोटो दिला आहे.

काय म्हणतात रवींद्र धंगेकर

आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्यानंतर पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यातील प्रकार

आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील प्रकार ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंढवा पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचे काम करतात, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या आरोपासंदर्भात त्यांनी वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना कॉन्सटेबल असल्याचा दावा केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करा

आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे बिघडवणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करावी. त्याला निलंबित करा, अन्यथा ४८ तासांत त्याचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील, असे म्हटले आहे.

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद