फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर हातात हत्यारं असलेले फोटो, पुण्यात 19 जणांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साईट्सवर बंदूक तर कधी कोयता घेऊन स्टेटस ठेवण्याचे नवे फॅड निर्माण झालं आहे.

फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर हातात हत्यारं असलेले फोटो, पुण्यात 19 जणांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई
फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर हातात हत्यारं असलेले फोटो, पुण्यात 19 जणांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साईट्सवर बंदूक तर कधी कोयता घेऊन स्टेटस ठेवण्याचे नवे फॅड निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड गुंड विरोधी पथकाच्या पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यात तब्बल 19 जणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी कोयता भाई ऊर्फ यम भाईने कोयता हातात घेऊन ‘छक्या-पंजांचं ऐकून कुत्रीही चालतात, पण आमची सूत्रं येरवडा जेलमधून हलतात’, अशा आशयाचा व्हिडिओ शेअर करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्याच यम भाई म्हणजेच मयूर सरोदेला पोलिसांनी बेड्या ठोकत त्याची धिंडही काढली होती. पोलिसांच्या कारवाईनंतरही सरोदेकडून आणखी दोन कोयते हस्तगत करत पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलंय. तर शहरातील अशाच दुसऱ्या घटनेत चिंचवडच्या 18 वर्षीय राज अवधूत शर्मा या अशाच भाईने कोयता हातात घेत व्हाट्सअॅप स्टेटस ठेवले होते. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

…तर अटक करु, पोलीस आयुक्तांचा इशारा

कधी दहशत माजवण्यासाठी, तर कधी परिसरात दबदबा ठेवण्यासाठी तर कधी गंमत म्हणून असं स्टेटस ठेवत असाल तर तुम्हाला पोलीस कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

“याप्रकरणी 11 गुन्हे दाखल करुन 19 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तरुणांकडून कोयता, तलवारी, पिस्तूल किंवा धारदार हत्यार हातात घेऊन फोटो काढत ती सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. याचा अर्थ ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात दहशत पसरविणे किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करणे हा गुन्हाच आहे. विशेष म्हणजे काही लोक आपल्याकडे कोयता असल्याचं गुणगाण गातात. तर काही वेगवेगळे दावे करतात. यातून या कोयता भाईंना दहशत निर्माण करायची असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आम्ही त्यांना बेड्या ठोकत आहोत”, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.

हेही वाचा :

रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसले, पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग, 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

पुण्यात स्मशानभूमीतच युवकाची हत्या, दोघे जण ताब्यात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI