Video: MH 12, फॉरच्युनर चोरून भामट्यांचा पोबारा! फॉरच्युनर चोरणारे ठरले अनफॉर्च्युनेट, CCTVनं सगळं पाहिलं

Pune crime News : लक्ष्मीनगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरासमोर अष्टविनायक सोसायटी आहे. वीर यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांची महागडी फॉरच्युनर लावली होती.

Video: MH 12, फॉरच्युनर चोरून भामट्यांचा पोबारा! फॉरच्युनर चोरणारे ठरले अनफॉर्च्युनेट, CCTVनं सगळं पाहिलं
पुण्यात कारची चोरी..
Image Credit source: TV9 Marathi
अश्विनी सातव डोके

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 07, 2022 | 12:39 PM

पुणे : फॉरच्युनर (Toyota Fortuner) म्हणजे जणू प्रतिष्ठेचं लक्षणंच. भली मोठी टोयोटा फॉरच्युनर घेऊन ती मिरवण्याचा मिजासही औरच! पण पुण्यात एका फॉरच्युनर मालकाच्या गाडीला कुणाची नजर लागली कुणास ठावुक? फॉरच्युनरची चोरी झाली. चोरांनी चलाखी केली. फॉरच्युनर चोरणं (Car theft) काही सोपी गोष्ट नाहीच. तिलाही लॉक केलेलं असेलच. पण तरिही ही कार चोरण्यात चोरट्यांना यश आलं. कारचं लॉक फोडलं. गाडीत शिरले. गाडी पळवली. चोरट्यांना वाटलं आपण फारच ‘फॉरच्युनेट’ आहोत. फॉरच्युनर चोरण्याचा आनंद त्यांना झाला असेलच. पण ही सगळी चलाखी फार वेळ टिकण्यासारखी नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं आपलं काम चोख केलं. फॉरच्युनर पळवून नेणारे भामटे कॅमेऱ्यात कैद झाले. पार्किंगमधून गाडी रस्त्यावर बाहेर काढेपर्यंतचा सगळा थरारा सीसीटीव्ही (Pune car theft video) कॅमेऱ्यात टिपला गेलाय.

पाहा व्हिडीओ :

पुण्यातील पर्वती परिसरात चोरीची ही घटना घडली. सोसायटीच्या पार्किंगमधून पार्किंग चोरीची ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांना आता तक्रारही देण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास घ्यायला सुरुवात केलीय.

नेमकी कुठं घडली घटना?

पर्वतीच्या लक्ष्मीनगर येथील अष्टविनाय सोसायटीच्या पार्किंगमधून 18 लाखांची महागडी फॉरच्युर चोरीला गेली. सुरेंद्र वीर यांची ही कार होती. या चोरीप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आता चोरट्यांचा शोध घेतला जातोय.

लक्ष्मीनगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरासमोर अष्टविनायक सोसायटी आहे. वीर यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांची महागडी फॉरच्युनर लावली होती. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. फॉरच्युनर लांबवून चोरटे पसार झाले. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरीची ही संपूर्ण घटना कैद झाली असून आता याच्याच मदतीनं पोलीस अधिक तपास करत आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवनंदा जाधव या चोरीप्रकरणी तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

या प्रश्नांचं काय?

दरम्यान, चोरीच्या घटनेवेळी सोसायटीमध्ये वॉचमन नव्हता का? गाडी लॉक केली नव्हती का? गाडी चोरताना सेंट्रल लॉक सायरन का वाजला नाही? असेही अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण चोरांच्या मोठ्या शिताफीनं ही गाडी पार्किंगमध्ये लांबल्यानं आता महागड्या गाड्या खरेदी केलेल्या पुण्यातील लोकांमध्ये घबराट पसरलीये.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें